कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येते माहितेय? जाणून घ्या कारण

ही तत्वे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने रोगविकार दूर होतात. मात्र तुम्हाला फक्त कांदा कापतानाच का डोळ्यातून पाणी येते असा प्रश्न नेहमीच पडत असेल.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

फळभाज्यांमध्ये अनेक गुणधर्म असून त्यामधून आपल्या पौष्टिक तत्वे मिळतात. ही तत्वे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने रोगविकार दूर होतात. मात्र तुम्हाला फक्त कांदा कापतानाच का डोळ्यातून पाणी येते असा प्रश्न नेहमीच पडत असेल. पण या मागील नेमके कारण तुम्हाला माहिती आहे का काय आहे. कारण कांदा कापताना त्याचा थेट संबंध त्यामध्ये असणाऱ्या घटकांसोबत आहे. कांद्यामध्ये काही गंधसंयुक्ते संयुग असतात त्याचसोबत एन्झाइमदेखील सुद्धा असतात. मात्र जो पर्यंत कांदा कापत नाहीत तो पर्यंत संयुगे आणि एन्झाइम्स परंपरेपासून दूर राहतात.

पण कांदा कापला गेला की त्या संयुगांचे रुपांतर अॅसिडमध्ये होते आणि एन्झाइम अॅसिडचे रुपांतर गंधकयुक्त ऑक्साईडमध्ये होते. हे रसायन बाष्पनशील असते त्यामुळे त्याचे रुपांतर वायूत होऊन ते थेट डोळ्यात शिरते. ही प्रक्रिया डोळ्यातील अश्रुंमधील पाण्याशी होते आणि त्याचे रुपांतर सलफ्युरिक अॅसिडमध्ये होते. हे अॅसिड डोळे चुरचूरण्यास कारणीभूत ठरल्यानंतर डोळ्यातून पाणी येण्यास सुरुवात होती. कांद्याच्या पेशींमध्ये असणार्‍या दोन तेलांपैकी एका तेलामध्ये वासयुक्त आणि डोळ्यांना दाहक, चुरचुरणारे घटक असतात. डोळ्यातून अश्रू आणणारे असे हे रसायन असते. डोळ्यांची जळजळ होऊन पाणी येणे हा काही त्रास नाही आहे.(थंडीच्या दिवसात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्या 'हे' आरोग्यदायी सूप)

तर कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत असल्यास तो कापण्यापूर्वी 20-25 मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवा. तसेच कांद्यावरील नको असलेले आवरण काढून टाकला जातो आणि शेवटी असलेला भाग कापल्याने डोळ्यातून पाणी येणार नाही. त्याचसोबत कांदा कापण्यापूर्वी तो वाहत्या पाण्याखाली धरुन ठेवा म्हणजे कापताना डोळे चुरुचुरणार नाही आणि पाणी सुद्धा येणार नाहीत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif