Sweet History OF Gulab Jamun: गुलाब जामून पाककृती, आवश्यक सामग्री; इतिहास आणि संस्कती
गुलाब जामून हे नाव पर्शियन शब्द गुलाब आणि जामून पासून आल आहे. गुलाब" हा शब्द पर्शियन शब्द 'गुल' (फ्लॉवर) आणि 'आब' (पाणी) पासून आला आहे
गुलाब जामुन हे दक्षिण आशियातील विशेषतः भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये लोकप्रिय मिष्टान्न आहे. गुलाब जामून हे नाव पर्शियन शब्द गुलाब आणि जामून पासून आल आहे. गुलाब हा शब्द पर्शियन शब्द 'गुल' (फ्लॉवर) आणि 'आब' (पाणी) पासून आला आहे, जो गुलाबाच्या पाण्याचा संदर्भ देतो आणि जामुन” किंवा “जामन” हा Syzygium jambolanum साठी एक हिंदी शब्द आहे समान आकार असलेले भारतीय फळ सामान्यतः काळा जांभूळ असे ओळखले जाते.
या मिठाई चा मोठा इतिहास आहे आणि उपखंडातील लोक पिढ्यानपिढ्या त्याचा आनंद घेत आले आहेत. पाकशास्त्रीय इतिहासकार मायकेल क्रोंडल यांच्या मते, भारतातील मुघल सम्राटांच्या आक्रमणानंतर लुकमत अल-काझी (लोकमा) किंवा गुलाब जामुन हे तेलात तलेले व गुलाब सरबत टाकून बुडवलेल्या पाकात टाकून बनवलेले पदार्थ हे पर्शियन डिशमधून आले आहेत. गुलाब जामुन हे भारतीय उपखंडातील एक अत्यंत लोकप्रिय मिठाईन् आहे आणि ती बहुतेकदा लग्न, उत्सव आणि इतर विशेष प्रसंगी आपल्याला पाहायला मिळते. गुलाब जामून हे त्याच्या उत्कृष्ट चवी साठी जाणला जातो. जो तोंडात टाकल्या टाकल्या विरघळून जातो आणि तोंडात गोडवा आणतो.
गुलाब जामुनचे अनेक प्रकार आहेत, प्रत्येकाची स्वतःची खास चव आहे. उदाहरणार्थ, "पंतुआ" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलाब जामुनची बंगाली आवृत्ती पनीर वापरून बनवली जाते आणि ती पारंपारिक रेसिपीपेक्षा खूपच मऊ आणि मलईदार आहे. राजस्थानी आवृत्ती, चाशनी वाले गुलाब जामुन म्हणून ओळखली जाते खवा वापरून बनविली जाते आणि पातळ सरबत मध्ये भिजवली जाते, ज्यामुळे ते कमी गोड आणि अधिक आंबट चव देते. हेही वाचा: Aamras Tops List of World's Best Mango Dishes: जगातील सर्वोत्कृष्ट मँगो डिशेसमध्ये 'आमरस'ने पटकावला पहिला क्रमांक; Taste Atlas ने जारी केली यादी
गुलाबजमून एक वर्सटाइल मिठाई आहे ही आपण फक्त असच खाऊ सकतो किवहा मग इतर कुटल्या मिठाई वर गुलाब जमून चे बारीक तुकडे करून ते सजवण्या करती वापरू सकतो. आणि आता नवीन ट्रेंड आहे ज्यात आता लोकाना गुलाबजमून व्हॅनिला आइस क्रीम सोबत खाला जातो. गुलाब जामुनने दक्षिण आशियाबाहेर ही लोकप्रियता मिळवली आहे आणि आता जगभरातील अनेक भारतीय रेस्टॉरंटमध्ये तो आढळू येतो.
गुलाब जामून पाककृती आणि आवश्यक सामग्री
सामग्री:
२५० ग्राम खवा, १०० ग्राम मैदा,३०० ग्राम साखर,बेकिंग सोडा,आर्ध चमचा वेलची पूड, आर्ध कप दूध, ३ वाट्या पानी,सजवण्यासाठी कापलेले बदाम किवहा पिस्ता आणि तळण्यासाठी ३ कप तूप.
कृती
- एक भांड्यात मैदा, खवा, वेलची पूड व बेकिंग सोडा चिमटी भर हे सर्व एकत्र मिक्स करून घ्या मग आता जेवड लागेल तेवडे दूध टाकून चांगल मळून घ्या.
- आता मललेल्या पिटा ला १० मीन साठी साइड ला धाकुण ठेवा.
- १० मिंट नंतर आता त्याला परत एकदा थोडा मळून त्याचे तुम्हाला पाहिजे तेवड्या आकाराचे गोळे बनवा.
- एक कडईत तूप गरम करा व गरम झाल्यावर आता गॅस मध्यम आचे वर करा व गुलाब जमून सोनेरी रंग येई पर्यन्त तळा.
- आता एका दुसऱ्या भांड्यात पानी गरम करायला ठेवा पानी गरम झाल्यावर त्यात साखर टाका व थोडी वेलची पूड टाका, आता साखर पूर्ण विरघळून जो पर्यन्त पाक होत नाही तो पर्यन्त गॅस चालू ठेवा. एकदा का पाक तयार झाला आता गॅस बंद करून, पाकाला १० मीन थंड होऊन द्या.
- आता थंड झालेलेल्या पाकात तललेले गुलाब जमून टाका व त्यांना थोडा वेळ पाकात जो पर्यन्त ते नरम होत नाही तो पर्यन्त त्यांना पाकात ठेवा.व एक तास नंतर ते चांगले मऊ होतील.
- आता एका वाटीत काडा व वरतून कापलेले बदाम व पिसताचे काप घाला आणि खा.
गुलाब जामून हा पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. इतकेच नव्हे तर घरगुती कार्यक्रम, आलेल्या पाहुण्यांचा पाहूणचार यांसाठी तुम्ही त्याचा खास नजराणा सादर करु शकता. नेहमीच्या भोजनानंतरही तुम्हाला जर काही गोड डीश हवी असेल तर तुम्ही गुलाबजामचा वापर करु शकता. फक्त गुलाबजाम या पदार्थात उच्च प्रतीने साखर असते. त्यामुळे तुम्हाला जर आरोग्याची काळजी असेल किंवा तुम्हास मधुमेह किंवा इतर कोणते आजार असतील तर गुलाबजामसारखे पदार्थ एका मर्यादेत आणि प्रमाणातच खा.