Gatari 2021 Special Recipe: गटारी निमित्त घरच्या घरी बनवा 'या' लज्जतदार आणि झणझणीत नॉनव्हेज रेसिपी

कारण या दिवसानंतर संपूर्ण श्रावण महीना मांसाहार खाता येत नाही.

Gatari 2021 Special Recipe (Photo - YouTube)

श्रावण महीना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या महिन्याची सुरुवात होण्याआधी येते ती 'आषाढी अमावस्या' (Ashadhi Amavasya) ज्याला अलीकडे 'गटारी अमावस्या' (Gatari Amavasya) असे ही म्हटले जाते. या दिवशी घराघरात नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात आणि त्यावर ताव मारला जातो. कारण या दिवसानंतर संपूर्ण श्रावण महीना मांसाहार खाता येत नाही. यंदा गटारी रविवार, 8 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. गटारी निमित्त एकत्र जमून नॉनव्हेजच्या पदार्थांवर ताव मारण्यासाठी रविवार अगदी जुळून आला आहे. तेव्हा या दिवशी तुम्ही घरी चमचमीत पदार्थ बनवण्याच्या तयारीत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहोत.  (Gatari Amavasya 2021 Date: यंदा कधी साजरी होणार गटारी? श्रावण सुुरु होण्यापूर्वी 'या' दिवशी घेऊ शकता नॉन व्हेजचा आस्वाद)

गटारी स्पेशल चिकन लॉलीपॉप

गटारी स्पेशल झणझणीत मटण

गटारी स्पेशल फिश थाली

मसाला फिश करी

वऱ्हाडी चिकन

रविवारच्या आधी बुधवार, 4 ऑगस्ट आणि शुक्रवार 6 ऑगस्ट रोजी तुम्ही गटारी सेलिब्रेट करु शकाल. दरम्यान, काहीजण श्रावण संपताच लगेचच मांसाहार घेतात तर काहीजण गणपती विर्सजनानंतर नॉन व्हेज खाणे सुरु करतात.