IPL Auction 2025 Live

Dussehra 2023: दसरा सणाचा उत्साह, 175 कोटी रुपयांचा 17 लाख किलो जिलेबी आणि फाफडा फस्त

जिलेबी (Jalebi) आणि फाफडा (Fafda) खरेदीसाठी आणि या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोक रांगेत उभे होते.

Fafda and Jalebi (Photo Credit- Wikimedia Commons)

Ahmedabad Dussehra Celebration: गुजरातची राजधानी, अहमदाबाद शहरातील रहिवाशांनी दसरा उत्सवादरम्यान एकाच दिवसात तब्बल 175 कोटी रुपये खर्च केले. इतके पैसे दसरा सणाच्या वस्तूखरेदीत नव्हे. तर केवळ नत्यांच्या आवडत्या स्नॅक्स, फाफडा आणि जिलेबी खरेदीच्या नावाखाली. उत्सवादरम्यान पुढे आलेली ही आकडेवारी अहमदाबाद शहरातील नागरिकांची या स्वादिष्ट पदार्थांबद्दल खोलवर रुजलेली आपुलकी दर्शवतो. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दसरा सणादिवशी स्थानिक फरसाण स्टोअर्स गजबजलेले केंद्र बनले होते. जिलेबी (Jalebi) आणि फाफडा (Fafda) खरेदीसाठी आणि या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोक रांगेत उभे होते.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबादच्या रहिवाशांनी एकाच दिवशी जवळपास 8.5 लाख किलोग्रॅम मिठाई एकाच दिवशी फस्त केली. दरम्यान, दसऱ्याच्या सणामध्ये फाफडा आणि जिलेबीची मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. कच्च्या मालाचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी, फाफडाच्या किमती 750 ते 1,300 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत वाढल्या, तर जिलेबीची किंमत 900 ते 1,000 रुपये प्रति किलोग्रॅम होती. द प्रिंट इंडियाने दिलेल्या वृत्तानुसरा, दसरा सणादरम्यान या प्रतिष्ठित पदार्थांच्या एकूण विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत केवळ 10% वाढ झाली आहे. किंमती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या असूनही नागरिकांचा खरेदीचा उत्साह किंचीतही कमी झालेला पाहायला मिळाले नाही.

बेसनापासून बनवलेला फाफडा, तळलेली जिलेबी नाश्तासाठी वापरणे ही एक सामान्य बाब आहे. आंबलेल्या पिठात आणि साखरेच्या पाकात बुडवून बनवलेला खमंग तळलेल्या पदार्थाचा आनंद घेण्यास गुजरातच्या लोकांच्या हृदयात विशेष स्थान आहे. असे मानले जाते की या लोकप्रिय स्नॅक्स भोजनाची प्रत्यक्ष भगवान रामांनाही आवडत असे.

अहमदाबादच्या दसऱ्याच्या उत्सवात फाफडा आणि जिलेबी ठळकपणे भाव खात असताना भारतातील इतर राज्यांमध्येही हा सण दणक्यात साजरा झाला. या राज्यांमध्ये कोसंब्री मसूर कोशिंबीर, म्हैसूर पाक, वडा आणि इतरही बऱ्याच पदार्थांचा देशभरातील लोकांनी आस्वाद घेतला. जलेबी- जिलेबी हा एक गोड पदार्थ आहे. जो दक्षिण आशियामध्ये लोकप्रिय आहे. याला जिलापी, जिलीपी आणि झालेबिया असेही म्हणतात. दक्षिण आशियामध्ये रमजान आणि दिवाळीमध्ये जलेबी विशेषतः लोकप्रिय आहे. मायग्रेन डोकेदुखी कमी करण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी आणि दम्यापासून मुक्त होण्यासाठी हा पदार्थ गरम दुधासोबत काही ठिकाणी खाल्ला जातो.

फाफडा- फाफडा हा बेसन, हळद आणि कॅरमच्या बियांनी बनवलेला लोकप्रिय गुजराती नाश्ता आहे. हा पदार्थ कुरकुरीत होईपर्यंत तळला जातो आणि चटणी, कच्च्या पपईची कोशिंबीर किंवा जिलेबीसह ताटात वाढला केले जाते. रविवारी आणि दसऱ्याला अनेक गुजराती कुटुंबांसाठी फाफडा हा खास नाश्ता आहे. महत्त्वाचे म्हणजे हा पदार्थ दिवसाच्या कोणत्याही वेळी खाल्ले जाऊ शकतात.