Yoga Day 2020 Wishes in Marathi: जागतिक योग दिन निमित्त मराठमोळी Messages, Wallpapers, Greetings शेअर करुन द्या योगाप्रेमींना शुभेच्छा!

भारतासह जगभरात आज (21 जून) आंतरराष्ट्रीय योग दिनाची (International Yoga Day) धूम सुरू झाली आहे.

International Yoga Day 2020 Messages (Photo Credits: File)

International Yoga Day 2020 Marathi Messages: भारतासह जगभरात आज (21 जून) आंतरराष्ट्रीय योग दिनाची (International Yoga Day) धूम सुरू झाली आहे. भारतीय प्राचीन परंपरेचा एक भाग असलेला 'योगाभ्यास' आता जगभर पसरला आहे. 21 व्या शतकामध्येही अत्याधुनिक वैद्यशास्त्रासोबत योगाभ्यास करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आता संशोधकांनीही मान्य केले आहेत. त्यामुळे आज जागतिक योग दिनाचं औचित्य साधून या दिवसाचं तुम्हीही नियमित योगाभ्यासाला काही वेळ काढायला नक्की सुरूवात करा.

योगा हा केवळ एक व्यायामाचा प्रकार नाही तर शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचा सोपा मार्ग आहे. आपल्या आयुष्यात व्यायाम आणि योगाचे अतिशय महत्त्व आहे. दररोज योगा केल्याने ताणतणावपासून दूर होतो. तसेच हाडं, मांसपेशी आणि सांधे दणकट राहातात. योग केल्याने आपल्या शरीराला नवी ऊर्जा मिळते. योग आपल्याला विविध आजारांपासून दूर ठेवतो. तर यंदाच्या जागतिक योग दिन निमित्त मराठमोळी Messages, Wallpapers, Greetings शेअर करुन द्या योगाप्रेमींना शुभेच्छा!(Yoga for Lazy People: जागतिक योग दिनापासून यंदा योगाभ्यासाला सुरूवात करणार्‍या आळशी लोकांसाठी '5' सोप्पी योगासनं!)

International Yoga Day (Photo Credits-File Image)
International Yoga Day (Photo Credits-File Image)
International Yoga Day (Photo Credits-File Image)
International Yoga Day (Photo Credits-File Image)
International Yoga Day (Photo Credits-File Image)

योग हे केवळ शरीराचे नाही तर मनाचे देखील शास्त्र आहे. त्यामुळे सध्याच्या कठीण काळात शरीरासोबत मानसिक आरोग्य राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हीच बाब ध्यानात घेऊन यंदा कुटुंबासह योगदिन साजरा करा. त्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य राखले जाईल यात वादच नाही.