World Emoji Day 2019: Facebook, WhatsApp वर चूकीच्या अर्थाने या '5' इमोजी वापरण्यापूर्वी जाणून घ्या त्याचा खरा अर्थ काय?
7 जुलै हा दिवस World Emoji Day म्हणून साजरा केला जातो. Emojis ची विकीपीडिया समजल्या जाणार्या Emojipedia चे संस्थापक Jeremy Burge यांनी हा दिवस साजरा करायला सुरूवात केली आहे. 2014 सालपासून 17 जुलै हा दिवस 'वर्ल्ड इमोजी डे' म्हणून साजरा करायला सुरूवात झाली.
Emojis हा आता आपल्या जीवनशैलीचाच एक भाग झाला आहे. डिजिटल होत चाललेल्या युगात, व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या आपण आहारी जात आहे. मेसेज करतानाही इमोजी वापरुन आपण अनेकदा भावना व्यक्त करतो. त्यामुळे शब्दांच्या भाषेइतकीच आता या Emojis ची भाषा समजणंदेखील गरजेचे आहे. अन्यथा अर्थाचा अनर्थ घडू शकतो. म्हणून जगात या Emojis चं मह्त्त्व अधोरेखित करण्यासाठी त्याचा खास दिवसदेखील आहे. 17 जुलै हा दिवस World Emoji Day म्हणून साजरा केला जातो. Emojis ची विकीपीडिया समजल्या जाणार्या Emojipedia चे संस्थापक Jeremy Burge यांनी हा दिवस साजरा करायला सुरूवात केली आहे. 2014 सालपासून 17 जुलै हा दिवस 'वर्ल्ड इमोजी डे' म्हणून साजरा करायला सुरूवात झाली.
यंदा जगभरात 6 वा 'वर्ल्ड इमोजी डे' आज (17 जुलै) साजरा होत आहे. मग जाणून घ्या हजारो इमॉटिकॉन्समधील हमखास अनेकांना ज्या इमोजीचा खरा अर्थच कदाचित ठाऊक नाही अशा नेहमीच्या वापरातील इमोजी कोणत्या?
Woman with Bunny Ears
ही इमोजी अनेकदा दोघी एकत्र मज्जा करू या आशयाची असावी असं वाटत असेल पण जपानी संस्कृतीनुसार Woman with Bunny Ears या इमोजीचा खरा अर्थ सेक्स अपिलसाठी केला जातो.
Dizzy Symbol
या इमोजीमध्ये चकमणारा तारा असल्याने अनेकदा काही चमत्कारित गोष्टी दर्शवण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करत असाल तर तुम्ही चुकत आहात कारण त्याचा खरा अर्थ चक्रावणं असा आहे. पूर्वी कार्टुन फिल्ममध्ये एखाद्याच्या डोक्याला मार लागला तर तारे चमकल्यासारखं दृश्य दाखवलं जात असे तोच या इमोजीचा खरा अर्थ आहे.
Astonished Face
अनेकदा ठार मेल्याची भावना व्यक्त करण्यासाठी ही इमोजी वापरली जात असेल तर तुम्ही चुकताय कारण याचा अर्थ आश्चर्यचकीत असा आहे.
T-rex Emoji
T-rex ही डायनासॉरची इमोजी तुम्ही समोरच्या व्यकतीला 'तुमच्याशी पंगा घेऊ नका' असा इशारा देण्यासाठी वापरू शकता.
Poop Emoji
अनेकदा समोरच्या व्यक्तीचं म्हणणं हसण्यावारी नेताना, खिल्ली उडवताना ही इमोजी वापरली जाते पण जपानी संस्कृतीमध्ये त्याचा अर्थ 'गुडलक' असा मानला जातो.
Bobble AI ने आज साजर्या होणार्या World Emoji Day च्या पार्श्वभूमीवर स्मार्टफोनवर होणार्या संवादामध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्या दोन टॉप इमोजी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार "tears of joy" आणि "blowing a kiss" या इमोजी वापरण्याचं प्रमाण अधिक आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)