Ganpati Visarjan 2024: अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024) ही वर्षातील विशेष तिथींपैकी एक मानली जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला गणेश उत्सव संपतो आणि गणपतीचे विसर्जन (Ganpati Visarjan 2024) होते. या वर्षी, 17 सप्टेंबर 2024 ही अनंत चतुर्दशी आहे, या दिवशी गणपतीचे विसर्जन आणि भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्त गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन पवित्र नदी, तलाव किंवा समुद्रात करतात. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काही लोक घरातील गणेश मूर्तीचे विसर्जन बादलीत किंवा मोठ्या बाथटबमध्ये करतात. यासोबतच बाप्पा पुढच्या वर्षी लवकर यावेत, यासाठी प्रार्थना करतात. पण गणेश विसर्जनाच्या वेळी बाप्पाची पाठ कोणत्या दिशेने असावी हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. (हेही वाचा - Ganpati Visarjan 2024 Status In Marathi: गणपती विसर्जनाच्या दिवशी Messages, Quotes, Facebook Greetings द्वारे द्या अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!)
गणपती विसर्जनाच्या वेळी बाप्पाचे तोंड कोणत्या दिशेला असावे?
- गणपती विसर्जन करताना गणपतीचे तोंड घराकडे असावे. बाप्पाची पाठ घराकडे फिरवल्याने गरिबी येते, अशी समजूत आहे. म्हणूनच विसर्जन करताना बाप्पाची पाठ घराकडे फिरवू नये असे म्हणतात.
- जर पाठ घराच्या दिशेने असेल तर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते.
- विसर्जन करण्यापूर्वी कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी. तसेच सर्व चुकांची माफी मागितली पाहिजे.
- शुभ मुहूर्तानुसार बाप्पाला निरोप द्यावा.
- विसर्जनाच्या वेळी तामसिक गोष्टी टाळाव्यात.
गणेश विसर्जनाचे नियम -
- गणेश विसर्जनाच्या आधी विधीनुसार गणेशाची पूजा करावी.
- यानंतर त्यांना मोदक आणि घरगुती मिठाई अर्पण करा.
- वैदिक मंत्रांचा उच्चार करून श्रीगणेशाची आरती करा.
- यानंतर, स्वच्छ पात्रात शुद्ध पाणी भरा. त्यानंतर पाण्यात गंगाजल, फुले, अत्तर मिसळून
- मंत्रांचा जप करावा.
- विघ्नहर्ताचा जयजयकार करत त्यांना हळूहळू पाण्यात विसर्जित करा.
- नंतर ते पाणी पिंपळाच्या झाडाखाली किंवा भांड्यात ओतावे.
- त्यानंतर बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जित करावी.
गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळी 11:44 पासून भद्राकाल सुरू होत आहे. भाद्र कालावधी कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा उपासनेसाठी शुभ मानला जात नाही. त्यामुळे यावेळी गणेश विसर्जन करणे योग्य होणार नाही. यावर्षी, गणेश विसर्जनासाठी सर्वात शुभ मुहूर्त 17 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून सकाळी 9.10 पर्यंत आहे. अनंत चतुर्दशीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6:07 ते 11:44 पर्यंत आहे.
(Disclaimer: हा लेख लोकश्रद्धेवर आधारित आहे. येथे दिलेल्या माहितीच्या अचूकतेची लेटेस्टली मराठी पुष्ठी किंवा समर्थन करत नाही.)