Vat Purnima 2022 Vrat Katha: वट पौर्णिमा का साजरी केली जाते? काय आहे वट सावित्री व्रताची कथा; वैवाहिक जीवनातील आनंद टिकून राहण्यासाठी नक्की जाणून घ्या

यंदा हे व्रत 14 जून रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी कोणती सावित्रीची कथा वाचणे आवश्यक मानले जाते. चला तर मग या कथेविषयी जाणून घेऊयात...

Vat Purnima (Photo Credits-Facebook)

Vat Savitri Vrat Katha in Marathi: हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात येणार्‍या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पण जेव्हा ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा येते तेव्हा या तिथीचे महत्त्व अधिकचं वाढते. काही राज्यांमध्ये ज्येष्ठ पौर्णिमा ही वट पौर्णिमा व्रत म्हणून साजरी केली जाते. गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांतील महिला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्री व्रत करतात. यंदा हे व्रत 14 जून रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी कोणती सावित्रीची कथा वाचणे आवश्यक मानले जाते. चला तर मग या कथेविषयी जाणून घेऊयात...

वट सावित्री व्रत कथा -

पौराणिक मान्यतेनुसार, राजा अश्वपतीला मूलबाळ नव्हते. या हेतूने संतती प्राप्तीसाठी मंत्र पठण करताना ते दररोज सुमारे एक लाख आहुती देत ​​असतं. 18 वर्षे असे केल्यावर त्यांना एक सुंदर मुलगी मिळाली. जिचे नाव सावित्री होते. राजाची कन्या सावित्री अतिशय सुंदर होती. तिला योग्य वर न मिळाल्याने राजा दु:खी झाला. त्याने आपली मुलगी सावित्रीला स्वतः वर शोधायला पाठवले. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, सावित्री तपोवनात भटकू लागली. तेथे साल्वा देशाचा राजा द्युमत्सेन राहत होता, ज्याचे राज्य हिसकावले गेले होते. सावित्रीने या राजाचा मुलगा सत्यवान याला आपला पती म्हणून निवडले. (हेही वाचा -Vat Purnima 2022 Messages: वट पौर्णिमेनिमित्त Wishes, Images, WhatsApp Status, Greeting द्वारे सुवासिनींना द्या खास मराठी शुभेच्छा!)

ऋषिराज नारदांना जेव्हा सावित्री आणि सत्यवानाच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा ते सावित्रीच्या वडिलांकडे पोहोचले आणि त्यांना विचारले की, तुम्ही काय करत आहात? सत्यवानचे वय खूपचं कमी आहे. एक वर्षानंतर तो मरेल. हे ऐकून सावित्रीचे वडील अश्वपती अस्वस्थ झाले. नारद मुनींनी जे सांगितले ते सावित्रीच्या वडिलांनी सावित्रीला सांगितले. त्यानंतर अश्वपती यांनी सावित्रीला तू दुसऱ्या कोणाला तरी जीवनसाथी म्हणून निवड, असं सांगितलं.

सावित्रीने तिच्या वडिलांना सांगितले की, मी सत्यवानाशीचं लग्न करेन. कन्येच्या विनंतीनुसार राजा अश्वपतीने सावित्रीचा विवाह सत्यवानसोबत करून दिला. सासरच्या घरी गेल्यावर सावित्री पती आणि सासूच्या सेवेत गुंतली. वेळ निघून गेली आणि सत्यवानाच्या मृत्यूची वेळ जवळ येऊ लागली. सत्यवानाच्या मृत्यूची वेळ जवळ आल्यावर सावित्रीने तीन दिवस अगोदरच उपास सुरू केले. तिने नारद मुनींनी सांगितलेल्या तिथीला पितरांची पूजा केली.

प्रत्येक दिवसाप्रमाणे त्या दिवशीही सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला. त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. सावित्रीला नारदाचे शब्द आठवले. तिने सत्यवानाचे डोके आपल्या मांडीवर ठेवले. तेव्हा अचानक यमराज तेथे आले आणि त्यांनी सावित्रीचा पती सत्यवान याला सोबत नेण्यास सुरुवात केली. सावित्रीही यमराजाच्या मागे लागली. यमराजाने सावित्रीला खूप समजावले पण सावित्रीला पटले नाही. सावित्रीच्या निष्ठेने प्रसन्न होऊन यमराजांनी तिला वरदान मागायला सांगितले.

सावित्री म्हणाली, माझे सासरे वनवासी आणि अंध आहेत, त्यांना दृष्टी द्या. यमराज म्हणाले की, हे होईल पण आता तू परत जा. पण तरीही सावित्री यमराजाला जावू देत नव्हती. त्यानंतर यमराजाने तिला पुन्हा वरदान मागायला सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्याचे राज्य हिरावून घेतले आहे, ते त्यांना परत मिळावे. यमराजानेही सावित्रीला हे वरदानही दिले. पण त्यानंतरही सावित्री यमराज आणि त्यांचे पती सत्यवान यांच्या मागे लागली. तेव्हा यमराजांनी तिला तिसरे वरदान मागण्यास सांगितले. यावर सावित्रीने संतती आणि स्वतःसाठी सौभाग्य मागितले. यमराजानेही सावित्रीला हे वरदान दिले.

यानंतर सावित्रीने यमराजाला सांगितले की, देवा मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तू मला पुत्रवती होण्याचे वरदान दिलं आहे. हे ऐकून यमराजांनी सत्यवाचे प्राण पुन्हा शरीरात सोडून दिले. त्यानंतर सावित्री त्याच वटवृक्षाखाली आली जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता. यमराजाने दिलेल्या वरदानामुळे सत्यवान जिवंत झाला आणि दोघेही आनंदाने आपल्या राज्याकडे निघाले. अशा प्रकारे सावित्री-सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले.

(डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. कोणतीही माहिती किंवा विश्वास लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif