National Pollution Control Day 2023: 'राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस' का साजरा केला जातो? महत्त्व आणि इतिहास जाणून घ्या
वायू प्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण यामुळे आपले जीवन विस्कळीत होत आहे. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस (National Pollution Control Day 2023) दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
National Pollution Control Day 2023: देशात अलीकडे दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) मध्ये प्रदुषणाची (Pollution) समस्या अधिक बिकट बनत आहे. प्रदूषण हा एक मोठा विषय आहे ज्याचा सामना भारतच नाही तर संपूर्ण जग करत आहे. मानवाबरोबरच त्याचा निसर्गावरही परिणाम होत आहे. वायू प्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण यामुळे आपले जीवन विस्कळीत होत आहे. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस (National Pollution Control Day 2023) दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे काय इतिहास आहे ते जाणून घेऊयात...
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस इतिहास -
1984 मध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेमुळे हजारो लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले, तर अनेकांना घरेही सोडावी लागली. हा दिवस लक्षात ठेवण्यासाठी आणि प्रदूषण थांबविण्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो. (हेही वाचा - Mumbai pollution : जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर)
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस महत्त्व -
प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की त्याचा परिणाम जगभर दिसून येतो. हवा, माती, ध्वनी प्रदूषण अशा विविध प्रकारच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या गोष्टींबद्दल लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचे महत्त्व आणि उद्देश आहे. आपण मोकळ्या हवेत श्वास घेतो आणि त्यामुळे आपण जगत असतो. म्हणून वाढत्या प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच प्रदुषण कमी झाल्याने पर्यावरणाचे रक्षणही होईल. (हेही वाचा - Delhi Pollution: प्रदूषणाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, दिल्लीचा AQI 500 पार; 'या' 20 भागात श्वास घेणं ठरतय धोकादायक)
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसची थीम -
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील स्वच्छ आणि निरोगी ग्रहासाठी शाश्वत विकास ही थीम घेऊन राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जात आहे. या थीमद्वारे लोकांना निसर्गाविषयी जागरूक केले जात आहे. जेणेकरून येणाऱ्या काळात आपण आपले पर्यावरण वाचवून चांगले जीवन जगू शकू.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)