Sankashti Chaturthi 2021: वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

या दिवशी चंद्र रात्री उशिरापर्यंत दिसतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी होईल.

Lord Ganesha | Photo Credits: Instagram

Sankashti Chaturthi 2021: संकष्टी चतुर्थी उपवास वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला आहे. यावर्षी वैशाख संकष्टी चतुर्थी 30 एप्रिल रोजी शुक्रवारी आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा केली जाते. पूजेमध्ये त्यांना खास मोदकांचा नैवैद्य दाखवला जातो. तसेच या दिवशी गणेशाला 21 दुर्वा वाहन्याची प्रथा आहे. वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थीची तारीख, शुभ मुहूर्त आणि चंद्र दर्शनाची वेळ काय आहे, हे जाणून घेऊया.

संकष्टी चतुर्थी तिथी मुहूर्त -

वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी गुरुवार, 29 एप्रिल रोजी रात्री 10 वाजून 09 मिनिटांनी सुरू होईल. तसेच शुक्रवार 30 एप्रिल रोजी सायंकाळी 07 वाजून 09 मिनटांनी संकष्टीची समाप्त होईल. संकष्टी पूजेसाठी दुपारचा मुहूर्त असतो. त्यामुळे 30 एप्रिल रोजी दुपारचा मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशीचं संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येईल. (वाचा - Amarnath Yatra 2021 साठी सध्याची कोविड 19 ची स्थिती पाहता रजिस्ट्रेशन स्थगित)

संकष्टी चतुर्थी चंद्र दर्शनाची वेळ -

संकष्टी चतुर्थी पाळणाऱ्यांना या दिवशी चंद्राचे दर्शन करावे लागते. या दिवशी चंद्र रात्री उशिरापर्यंत दिसतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र दर्शन रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी होईल.

संकष्टी चतुर्थी पूजा -

संकष्टी चतुर्थी व्रत पाळणार्‍यांनी दुपारी विघ्नहर्ता श्री गणेशाची मनोभावे पूजा करावी. पूजेच्या वेळी गणेश चालीसा आणि गणेश जी यांचे मंत्र जप करावे. पूजेच्या समारोपात गणेशाची आरती करावी. हे व्रत केल्याने वाईट कामे देखील सुरळीत होतात. गणपतीच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात.