National Space Day 2024: राष्ट्रीय अवकाश दिवस कधी आहे? तारीख, थीम आणि महत्त्व घ्या जाणून
भारत अंतराळ संशोधनात लक्षणीय प्रगती करत आहे. त्यामुळे राष्ट्रीय अंतराळ दिन देशाच्या प्रगतीवर विचार करण्याची त्याचे योगदान साजरे करण्याची आणि भविष्यातील पिढ्यांना अंतराळ संशोधनात मोठे उद्दिष्ट ठेवण्याची प्रेरणा देते.
National Space Day 2024: चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग (Soft Landing) करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रोने (ISRO) गेल्या वर्षी 23 ऑगस्ट 2023 रोजी हा विक्रम केला होता. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोकडे होत्या. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उल्लेखनीय कामगिरी ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी भारतात राष्ट्रीय अंतराळ दिन (National Space Day 2024) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दरवर्षी 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
भारताची अंतराळ संशोधनात मोठी प्रगती -
भारत अंतराळ संशोधनात लक्षणीय प्रगती करत आहे. त्यामुळे राष्ट्रीय अंतराळ दिन देशाच्या प्रगतीवर विचार करण्याची त्याचे योगदान साजरे करण्याची आणि भविष्यातील पिढ्यांना अंतराळ संशोधनात मोठे उद्दिष्ट ठेवण्याची प्रेरणा देते. हा दिवस विज्ञान, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या प्रगतीमध्ये अंतराळ संशोधनाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो. (हेही वाचा -National Space Day: चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर भारत सरकारची मोठी घोषणा; दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार 'राष्ट्रीय अंतराळ दिन')
राष्ट्रीय अवकाश दिवसाचा इतिहास -
23 ऑगस्ट 2023 रोजी, भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश बनला. तसेच चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अवकाश दिवस’ म्हणून घोषित केला. भारत यावर्षी आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट 2024 रोजी साजरा करत आहे.
राष्ट्रीय अवकाश दिवस 2024 ची थीम -
23 ऑगस्ट रोजी एका विशेष थीमवर राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा केला जाईल. नॅशनल स्पेस डेची थीम प्रत्येक वर्षाच्या संदर्भात बदलली जाईल. या वर्षी राष्ट्रीय अंतराळ दिन 2024 ची थीम 'चंद्राच्या स्पर्शाने जीवनाचा अनुभव घ्या: भारताची अंतराळ कथा', असं आहे. ही थीम समाज आणि तंत्रज्ञानावर अवकाश संशोधनाचा महत्त्वपूर्ण प्रभाव अधोरेखित करते. (हेही वाचा - National Space Day 2024: यंदा 23 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या पहिल्या 'राष्ट्रीय अंतराळ दिना'च्या समारंभासाठी ISRO सज्ज; विद्यार्थ्यांसाठी खास Hackathon चे आयोजन)
राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच आयोजन -
2024 मध्ये भारतातील पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस देशभरात साजरा करण्यासाठी विशेष तयारी सुरू आहे. भारत सरकार भारताच्या अंतराळ मोहिमांचे यश प्रदर्शित करण्यासाठी आणि तरुणांना प्रेरणा देण्यासाठी एक महिनाभर चालणारी मोहीम सुरू करत आहे. या दिवसाच्या निमित्ताने अंतराळ संशोधन किंवा मोहिमेतील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्ताने भारत मंडपम येथे दोन दिवसीय भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
राष्ट्रीय अंतराळ दिनाचे महत्त्व -
भारतातील राष्ट्रीय अंतराळ दिनाचे महत्त्व म्हणजे लोकांना प्रेरणा देणे आणि अवकाश संशोधनाच्या महत्त्वाबद्दल शिक्षित करणे हे आहे. यात चांद्रयान, आदित्य एल-1, मंगळयान आणि गगनयान यासह अनेक मोहिमांचा समावेश आहे.