Daughters Day 2022 Date: जागतिक कन्या दिवस कधी आहे? हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

हा दिवस आपल्याला आपल्या मुलींना जपण्याची आठवण करून देतो. मुली आपल्या आयुष्यात भरपूर प्रेम आणि आनंद आणतात. त्यामुळे मुलींचा उत्सव महत्त्वाचा आहे.

Daughters Day 2022 (PC -File Image)

Daughters Day 2022: जगभरात मोठ्या उत्साहात डॉटर्स डे साजरा केला जातो. विविध देश वेगवेगळ्या तारखांना तो साजरा करतात. सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी राष्ट्रीय कन्या दिवस (National Daughters Day 2022) साजरा केला जातो. यावर्षी 25 सप्टेंबर रोजी जागतिक कन्या दिन साजरा केला जाणार आहे. हा दिवस पालक-मुलीच्या नात्याला समर्पित आहे. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे देशातील मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे. देशातील मुलींसोबतच होणाऱ्या भेदभावाबाबत सर्व लोकांना जागरुक केले पाहिजे. हा दिवस आपल्याला आपल्या मुलींना जपण्याची आठवण करून देतो. मुली आपल्या आयुष्यात भरपूर प्रेम आणि आनंद आणतात. मुलींचा उत्सव महत्त्वाचा आहे. कारण, विकसनशील देशांमध्ये, मुलींना बर्‍याचदा ओझे म्हणून पाहिले जाते. परंतु, हा दिवस मुलींचे महत्त्व समजून घेण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. डॉटर्स डे हा मुलींबद्दलचा जिव्हाळा आणि वचनबद्धता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. राष्ट्रीय कन्या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊयात...

राष्ट्रीय कन्या दिवस तारीख -

यूएस मध्ये राष्ट्रीय कन्या दिवस दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय कन्या दिवस प्रत्येक सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी साजरा केला जातो, जो 2022 मध्ये 26 सप्टेंबर रोजी येतो. अमेरिकेत 1932 मध्ये राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जात होता. वर्माँटच्या वृत्तपत्रांमध्ये असे वृत्त आले होते की, डिसेंबरमध्ये संयुक्त ख्रिसमस आणि डॉटर्स डे सेलिब्रेशनसाठी डॉटर्स ऑफ युनियन वेटरन्सची भेट झाली. हा दिवस भारतातील काही भागांमध्ये मुलींच्या संघर्षाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात येतो. मुलींना मुलांपेक्षा कनिष्ठ मानले जाते होते. तसेच मुलींकडे ओझे म्हणून देखील पाहिले जात होते. त्यामुळे मुलींच्या अस्तित्वाची आणि कर्त्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी एक विशेष दिन साजरा करण्यास सुरूवात झाली. (हेही वाचा - Durga Puja 2022: दुर्गा पूजा उत्सव, इतिहास, महत्त्व आणि प्रथा; घ्या जाणून)

राष्ट्रीय कन्या दिन साजरा करण्याचे महत्त्व -

यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलगी म्हणजे चैतन्य, मुलगी म्हणजे आनंद. मुलगी म्हणजे मायेचा पाझर असते, बापाचा आधार असते. मुलगी कितीही मोठी झाली तरी ती तिच्या वडिलांसाठी परी असते. मुलगी ही जन्मदाती आहे. निसर्गाचं चक्र मुलीशिवाय अपूर्ण आहे. मुलगी प्रत्येक गोष्टीची सुरुवात आहे. तिच्याशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. समाजात मुलांएवढचं स्थान मुलींनादेखील दिलं जावं, तसेच मुलींचं महत्त्व समाजाला पटवून देण्यासाच्या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो.

राष्ट्रीय कन्या दिवस 2022 कसा साजरा करायचा?

हा दिवस सर्वप्रथम सामाजिक रूढी ओळखून आणि मुलींनी त्यांच्या पालकांच्या जीवनात आणलेल्या मूल्याचे कौतुक करून साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक संभाव्य मार्गाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारून संपूर्ण दिवस त्यांच्यासाठी काहीतरी खास नियोजन करून त्यांच्यावरील प्रेम आणि आपुलकी व्यक्त करू शकता. तसेच या दिवशी आपल्या मुलीला खास भेटवस्तूही देऊ शकता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif