Nag Panchmi 2024 Date: नागपंचमी कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व घ्या जाणून

धार्मिक मान्यतेनुसार, शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागांची पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते. तसेच सर्पदंशाची भीती कमी होते.

Nag Panchmi 2024 (फोटो सौजन्य - फाईल ईमेज)

Nag Panchmi 2024 Date: नागपंचमी (Nag Panchmi 2024) हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो. श्रावण महिना हा भगवान शिवाला सर्वात प्रिय आहे. या महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. यासोबतच या महिन्यात भोलेनाथांच्या आवडत्या नाग देवतेची पूजा केली जाते. नागपंचमी (Nag Panchmi) हा श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण आहे. धार्मिक मान्यतेनुसार, शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागांची पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते. तसेच सर्पदंशाची भीती कमी होते.

यंदा नागपंचमी कधी आहे?

यावर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. हरियाली तीजच्या दोन दिवशी नागपंचमी येते. नागपंचमीला शेष, पद्म, कंबल, शंखपाल, नाग अनंत, वासुकी, कालिया, तक्षक इत्यादींचे ध्यान करताना नागाची मूर्ती बनवून पूजा केली जाते. तसेच या दिवशी अनेक ठिकाणी सापाला दूध पाजण्याचे विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा केली जाते. महिला या दिवशी वारुळाची पूजा करून आपल्या भावाच्या संरक्षणासाठी प्रार्थना करतात. (हेही वाचा -Hariyali Teej 2024: हरियाली तीजची तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी, जाणून घ्या, अधिक माहिती)

नाग पंचमी मुहूर्त -

श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 12:36 पासून सुरू होईल आणि 10 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3:14 वाजता समाप्त होईल. त्यामुळे नागपंचमीसाठी पूजेचा सर्वोत्तम वेळ सकाळी 6:01 ते 8:37 पर्यंत असेल.

नागपंचमी सणाचे महत्त्व -

पौराणिक मान्यतेनुसार, अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जनमेजयाने साप मारण्याचा निर्णय घेतला आणि नागदह यज्ञ सुरू केला. यज्ञामुळे जगातील सर्व नाग जळू लागले, सर्पांनी प्राण वाचवण्यासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला. ऋषींनी राजा जनमेजयाला तसे न करण्याचे पटवून दिले आणि यज्ञ थांबवला. त्यामुळे सापांचे प्राण वाचले. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती. त्यानंतर नागपंचमीचा सण साजरा केला जाऊ लागला.



संबंधित बातम्या