Vat Purnima Vrat 2025 Date and Timings: यंदा वटपौर्णिमा कधी? जाणून घ्या वडाच्या पूजा विधीची तारीख, वेळ काय?

नवविवाहित महिला, तरूणींसाठी वटपौर्णिमेचा सण हा अजून खास असतो. या दिवशी सवाष्ण महिला नटून थटून वडाची पूजा करण्यासाठी जातात.

Pooja Sawant Vat Pournima | Image Credit: Instagram

हिंदू विवाहित महिलांसाठी वट पौर्णिमा (Vat Purnima Vrat) हा एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्रात ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते. सवाष्ण महिला या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात. वडाच्या झाडाची पूजा करून त्याला सात प्रदक्षिणा घालून पुढील सातही जन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना करतात. यंदा महाराष्ट्रात हा वटपौर्णिमेचा सण 10 जून 2025 दिवशी साजरा केला जाणार आहे. मग यंदा तुम्हीही वटपौर्णिमेची पूजा करणार असाल तर जाणून घ्या पूजेची तारीख, मुहूर्ताची वेळ काय? वटपौर्णिमेचं व्रत कधी आणि का पाळलं जातं?

पुराणातील कथेनुसार, सावित्रीने तिचा पती सत्यवानाचा जीव परत आणण्यासाठी एक व्रत केले. सावित्रीच्या भक्तीने भगवान यम प्रभावित झाले आणि त्यांनी सत्यवानाला मृत्युच्या तावडीतून मुक्त केले. असे मानले जाते की सत्यवानाचे निर्जीव शरीर वडाच्या झाडाखाली ठेवण्यात आले होते आणि याच वेळी सावित्रीने तिची तपश्चर्या सुरू केली आणि अत्यंत भक्तीने देवाची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. हे सर्व वडाच्या झाडाखाली घडले असल्याने, दीर्घायुष्य आणि शाश्वत प्रेमाचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते. Gift Ideas For Wife: वट पौर्णिमे दिवशी तुमच्या 'सावित्री' ला खूष करण्यासाठी गिफ्ट आयडियाज.

वटपौर्णिमा तारीख, मुहूर्त

पौर्णिमा तिथी सुरूवात - 10 जून सकाळी 11.35

पौर्णिमा तिथी सांगता - 11 जून दुपारी 1.13

वडाची पूजा मुहूर्त - 10 जून सकाळी 8.52 ते दुपारी 2.05 मिनिटं

 

वाण देत ऐकमेकींसोबत सणाचा आनंद लुटतात. पतीच्या आणि घरातील मोठ्या व्यक्तींच्या पाया पडतात. वडाचं झाडं 24 तास प्राणवायू देतं. त्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या देखील वडाचं झाड आरोग्यदायी आहे. आयुर्वेदामध्येही त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे नमुद करण्यात आले आहेत. हिंदू मान्यतेनुसार, शिव, ब्रह्मा आणि विष्णू वडामध्ये राहतात. हे झाड दीर्घकाळ हिरवे राहते आणि पर्यावरण संतुलनात विशेष योगदान देते. त्यामुळे या विशेष दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement