Vat Purnima 2020 Mehndi Designs: वट पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर 5 मिनिटांत काढा आकर्षक मेहंदी डिझाईन्स, पाहा सोप्पे मेहंदी पॅटर्न
वट पूर्णिमा 2020 साठी आता फक्त काही वेळ शिल्लक आहे. या दिवशी महिला हातावर अनेक प्रकारच्या मेहंदी डिझाईन्स लावतात. परंतु कधीकधी कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना मेहंदी काढायला वेळ मिळत नाही. अशा महिलांसाठी आम्ही आपल्यासाठी सुलभ मेंदीची पॅटर्न घेऊन आलो आहोत जे आपण फक्त 5 मिनिटांत आपल्या हातावर काढू शकतात.
Vat Purnima 2020 Mehndi Designs: वट पूर्णिमा 2020 साठी आता फक्त काही वेळ शिल्लक आहे आणि बरेच काही करण्यासारखे आहे. विवाहित महिला यंदा वटपौर्णिमेचा सण 5 जून रोजी साजरा करतील. वट पौर्णिमेला (Vat Purnima) वट सावित्री म्हणूनही ओळखले जाते आणि विवाहित हिंदू स्त्रिया हा दिवस साजरा करतात. विशेषत: गुजरात, महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, मिथिला आणि पश्चिम भारतातील काही राज्यांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. विवाहित महिलांसाठी वट पूर्णिमेचा सण अगदी महत्वाचा मानला जातो. या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार, हे व्रत केल्यावर पतीला दिर्घ आयुष्य प्राप्त होते. तसेच पुढच्या सात जन्मासाठी त्या स्त्रिला तोच पती मिळतो. या दिवशी विवाहित स्त्रिया साज शृंगार करतात. या उपवासात, आवश्यक पदार्थ तयार करण्यापासून, पूजा करण्यापर्यंत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या हातावर मेहंदी (Mehndi) लावणे आहे. (Vat Purnima Vrat 2020: 5 जून ला साजरी होणार वटपौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी)
या दिवशी महिला हातावर अनेक प्रकारच्या मेहंदी डिझाईन्स लावतात. परंतु कधीकधी कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना मेहंदी काढायला वेळ मिळत नाही. अशा महिलांसाठी आम्ही आपल्यासाठी सुलभ मेंदीची पॅटर्न (Mehndi Designs) घेऊन आलो आहोत जे आपण फक्त 5 मिनिटांत आपल्या हातावर काढू शकतात. वट पूर्णिमेच्या दिवशी खालील मेहंदी व्हिडिओज तुमच्या नक्की उपयोगात येतील.
हिंदू मान्यतेनुसार वट पौर्णिमेची पूजा म्हणा किंवा वट सावित्री महिला पतीच्या दिर्घ आयुष्य मिळावं यासाठी केली जाते. यासाठी महिला पहाटे उठून स्नान करतात आणि वधूप्रमाणे साज शृंगार करतात. विवाहित स्त्रिया सौभाग्यवाण म्हणून खण, नारळ, फळं, बांगड्या अशा वस्तू दान करतात. हिंदू रूढींमध्ये मेहंदी वधूच्या सोळा शृंगारपैकी एक मानली जाते. ही एक प्राचीन प्रथा आहे आणि स्त्रिया वार्षिक व धार्मिक प्रसंगी हातावर व पायांवर मेहंदी काढतात.
दरम्यान, या खास व्हिडिओंच्या मदतीने तुम्ही महिला वट पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हाता-पायांवर मेहंदीचे आकर्षक डिझाईन्स कडू शकतात. ही वट पूर्णिमा आपल्यासाठी शुभ आणि आपल्या विवाहित जीवनात आनंद आणेल अशी अपेक्षा करतो.
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2020 05:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

