Vasu Baras 2021 Wishes in Marathi: वसुबारस शुभेच्छा Quotes, Messages द्वारा देत साजरा करा गोवत्स द्वादशीचा दिवस

समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूला उद्देशून वसूबारस व्रत केले जाते.

Vasu Baras | File Image

Vasubaras Wishes in Marathi: हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी (Diwali). दिवाळीची सुरूवात वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशी (Govatsa Dwadashi) ने होते. ग्रामीण भारतामध्ये आज (1 नोव्हेंबर) घरातील गाई, वासरांची पूजा केली जाते. आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी दिवशी वसूबारस (Vasubaras) साजरी केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूला उद्देशून वसुबारस व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी वसुबारसच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे यासाठी ही पूजा केली जाते. मग दिवाळीच्या आजच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा देत या आनंदाच्या पर्वाला सुरूवात करण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटिंग्स, Wishes, HD Images, Wallpapers शेअर करत आजचा दिवस थोडा खास करा.

कृषिप्रधान भारत देशामध्ये पशूधन देखील महत्त्वाचे आहे. गाईला मातेसमान दर्जा देण्‍यात आला आहे. भारतीय सण संस्कृतीमध्ये आपल्या निसर्गातील घटकांनाही समाविष्ट करून पंचमहाभूतांप्रती आपला आदरभाव व्यक्त करण्याची शिकवण आहे. नक्की वाचा: Diwali 2021 Calendar With Dates in India: यंदा दिवाळीत धनतेरस, लक्ष्मी पूजन ते भाऊबीज कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक .

वसूबारस शुभेच्छा

Vasu Baras | File Image
Vasu Baras | File Image
Vasu Baras | File Image
Vasu Baras | File Image

वसूबारस दिवशी दूध, दूधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ व्यर्ज केले जातात. वसूबारसेच्या दिवशी संध्याकाळी गायींचे औक्षण केले जाते त्यांना आंघोळ घालून गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून त्यांना नमस्कार करतात. त्यानंतर गायीला गोड नैवैद्य दाखवण्याची रीत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif