Happy Rose Day 2019: 'रोझ डे'च्या दिवशी कोणत्या रंगाचं गुलाब तुमच्या मनातील कोणती भावना व्यक्त करते?

कोणत्या गुलाबाचा कोणता रंग तुमच्या मनातील भावना व्यक्त करतात हे पहा आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला Rose Day ला गुलाब द्या.

Rose Day 2019

Valentine’s Day 2019: फेब्रुवारी महिना सुरू झाला की तरूणाईला 'व्हेलेंटाईन डे' (Valentine’s Day) चे वेध लागतात. 'व्हेलेंटाईन डे' हे एका दिवसाचं सेलिब्रेशन नसतं तर आठवडाभर प्रत्येक दिवशी एक खास दिवस सेलिब्रेट केला जातो. या सेलिब्रेशनमध्ये पहिल्याच दिवशी रोझ डे असतो. 7 फेब्रुवारी हा दिवस रोझ डे (Rose Day) म्हणून साजरा केला जातो. प्रेमाचं आणि मैत्रीचं नातं जपण्यासाठी पहिल्यादिवशी गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. पण गुलाब कोणत्या रंगाचं आहे त्यावर तुमच्या मनातील भावना अवलंबून असतात. मग पहा कोणतं रंगाचं गुलाब काय सांगतं? Valentine’s Day 2019: Rose Day ते Valentine’s Day पहा कसं असेल हे आठवड्याभराचं Romantic सेलिब्रेशन

लाल गुलाब-

लाल गुलाब हे प्रेमाचं प्रतिक आहे. लाल रंगामध्येच 'रोमांस' आणि 'पॅशन' आहे. त्यामुळे प्रेमाची भावना थेट व्यक्त करायची असेल तर लाल रंगापेक्षा दुसरा पर्याय नाही. Valentine’s Day 2019: Rose Day दिवशी हॅपी रोझ डे' च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी Facebook, WhatsApp Status, SMS, Greetings

 

View this post on Instagram

 

Not a filter in sight!!! Just winter sunshine 🌹😍 #Roses #redrose #valentines #february #wow #Naomirose #red #love #passion #middlesbrough #florist #floristry #backtobusiness #flowerstagram #flowersofinstagram #premium

A post shared by Michaela 🌷 (@flowersbymichaela_florist) on

पांढरं गुलाब-

पांढरा रंग हा शांततेचं प्रतिक आहे. लाल रंगापूर्वी पांढरा रंग हा प्रेमाचं प्रतिक होता. पण आजही पांढरा रंग तुमच्यामधील प्रामाणिकपणा आणि पावित्र्याचं प्रतिक समजलं जातं. प्रेमातील पावित्र्याची कबुली देण्यासाठी पांढरा रंग वापरा. प्रामुख्याने लग्नामध्ये याच कारणासाठी प्रेमाचा नितळपणा दर्शवण्यासाठी पांढरा रंग वापरला जातो. नात्याच्या सुरूवातीच्या टप्प्यावर या रंगातून प्रेम व्यक्त केलं जातं. पांढरं गुलाब म्हणजे ‘I am thinking about you' असा त्याचा अर्थ आहे.

 

View this post on Instagram

 

her details. #bouquet #bridalbouquet #realwedding

A post shared by Joy Webb Smith (@purelyjoyousphotography) on

गुलाबी गुलाब -

गुलाबी रंगाचं गुलाब अत्यंत मोहक दिसतं. या गुलाबाच्या माध्यमातून तुमच्या मनातील भावना पोहचवताना त्यामधून अफेक्शन, अ‍ॅडमिरेशन व्यक्त होतं. गुलबी रंगाची छटा जशी गडद होते तसं तुमच्यातील साथीदाराबद्दल कृतज्ञता, जिव्हाळा याची कबुली देता येते. तुमच्यामधलं 'बेस्ट फ्रेंड'चं नातं या गुलाबातून व्यक्त होतं.

 

View this post on Instagram

 

#pinkrose#happyroseday🌹

A post shared by Amazing Photo World (@myhdworldd) on

पिवळं गुलाब-

तुमच्या निखळ मैत्रीची भावना मोकळी करायची असेल तर पिवळ्या रंगाचं गुलाब द्या. आनंद, उत्साह जपण्यासाठी हा रंग बोलका आहे. त्यामुळे किमान तुमच्यामधील मैत्री जपायची असेल तर पिवळ्या रंगाचं गुलाब तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आजारी व्यक्तीला आजारपणातून लवकर बाहेर पडावं या शुभेच्छा देण्यासाठी पिवळ्या रंगांचं गुलाब दिलं जाते.

 

View this post on Instagram

 

How Gorgeous💛🌻 #YellowRoses

A post shared by Nixxi T (@nixxitaylor) on

लॅव्हेंडर गुलाब -

लॅव्हेंडर हा रंग दिसायलाही अत्यंत मोहक आहे. या रंगाला पाहून मनात जशा भावना येतात तशाच त्या व्यक्त करण्यासाठी या रंगाचं गुलाब वापरलं जातं. लक्ष वेधून घेणार्‍या व्यक्तिमत्त्वाला तुमच्या मनातील भावना बोलून दाखवायच्या असतील तर या रंगाचा वापर करा.

 

View this post on Instagram

 

Ever feel an Angel’s breath in the gentle breeze? A teardrop in the falling rain? Hear a whisper amongst the rustle of leaves? Or been kissed by a lone snowflake? Nature is an Angel’s hiding place. -Carrie Latat This quote spoke to me. Since I lost both my parents before I turned 30 I am always open to signs from the Angels. Anyone else do this? . . . Angel Face. Floribunda. Very fragrant. Swim & Weeks. 1968.

A post shared by Roses In Arizona (@azrosegarden) on

नारंगी गुलाब -

पॅशन आणि आनंद या दोन्ही भावनांचा मिलाफ म्हणजे नारंगी रंगाचं गुलाब. प्रेम, मैत्री, अ‍ॅडमायरेशन देण्यासाठी नारंगी रंग मदत करतो. तुमचा साथीदार तुमच्यासोबत असल्याचा तुम्हांला गर्व असेल तर ती भावना समोरच्या व्यक्तीला नारंगी रंगाच्या गुलाबातून व्यक्त करा. तुमच्यामधील पॅशन आणि प्राईड यांचं ते प्रतिक आहे.

 

View this post on Instagram

 

Orange rose, with a touch of airbrush to make those petals P O P! 🧡 #bodohbakes #sugarrose

A post shared by Lily Bodoh (@bodoh_bakes) on

मग यंदाचा रोझ डे अगदी उद्यावर येऊन ठेपला आहे. मग तुमच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीला नेमकं काय सांगायचयं हे तुमच्या मनाशी अगदी पक्क झालंय का? मग त्या भावना गुलाबाच्या माध्यमातून नेमक्या समोरच्यापर्यंत पोहचवण्यासाठी योग्य रंगाच्या गुलाबाची आजच नक्की निवड करा.