IPL Auction 2025 Live

Tulsi Vivah 2022 Invitation Card: तुळशीच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका WhatsApp Messages, Images द्वारा देत आप्तांना द्या निमंत्रण

अशी धारणा आहे.

तुळशीचं लग्नं । File Image

दिवाळीची धामधूम महाराष्ट्रात तुळशीच्या लग्नापर्यंत सुरू असते. यंदा तुळशीचं लग्न (Tulsi Vivah) 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर पर्यंत होणार आहे. दारात तुळशीचं लग्न लावून मग घरातील मंगलकार्यांना सुरूवात केली जाते. कार्तिकी द्वादशी पासून पौर्णीमेपर्यंत तुळशीची लग्न लावली जाऊ शकतात. मग यंदा तुमच्याकडेही तुळशीच्या लग्नाचा बार उडणार असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, आप्तेष्टांना खास आमंत्रण देऊन निमंत्रित करू शकता. नक्की वाचा: Simple Rangoli Designs for Tulsi Vivah: तुळशीच्या लग्न सोहळ्याला काढा सुंदर आणि हटके रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ .

तुळस आणि शाळीग्राम यांच्या विवाह लावण्याची रीत आहे. प्रत्यक्षात तुळशीला नववधू प्रमाणे सजवून एखाद्या किशोर वयीन मुलाला समोर ठेवून त्याचं लग्न लावलं जातं. मग यंदा 2 वर्षांनी कोरोना मुक्त वातावरणात सण साजरा केला जात असताना तुळशीची लग्नं देखील जोरात होऊ द्या. नक्की वाचा: Tulsi Vivah 2022 Dates: तुलसी विवाह यंदा कधी? इथे जाणून घ्या तारखा.

तुळशीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका नमुना

नमुना 1:

कुर्यात सदा मंगलम!

आमच्या येथे 5 नोव्हेंबर दिवशी सायंकाळी 7.05 च्या मुहूर्तावर तुलसीविवाह संपन्न होणार आहे,तरीही आपण यंदा उपस्थिती लावावी हे अगत्याचं आमंत्रण!

आमच्या तुळशीच्या लग्नाला नक्की या!

विवाह तारीख - 5 नोव्हेंबर / शनिवार

विवाह मुहूर्त- सायंकाळी 7.05

---------------------------

तुळशीचं लग्नं । File Image

नमुना 2:

आज आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हं...

वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता

लग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे!

----------------------

तुळशीचं लग्नं । File Image

तुळशीचं लग्न लावणार्‍या व्यक्तीला या व्रताच्या माध्यमातून कन्यादान केल्याचं पुण्य मिळतं. अशी धारणा आहे. तर काहींच्या धारणेनुसार तुळशी विवाहाच्या व्रतामुळे घरातील कन्येला कृष्णाप्रमाणे वर मिळण्यास मदत होते. त्यामुळेही तुळशीची लग्नं जोरात पार पाडली जातात. तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह केला जातो. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात. तेव्हा तुळशीशी लग्न लावले जाते. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.