Tulsi Vivah 2022 Invitation Messages Format: तुलसी विवाहाचे आमंत्रण आप्तांना, प्रियजनांना WhatsApp Messages द्वारा देण्यासाठी खास नमूने !
यंदा त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी चंद्र ग्रहण असल्याने काही जण 7 नोव्हेंबर पर्यंतच हा तुलसी विवाहाचा कार्यक्रम आटोपता घेण्याच्या तयारी मध्ये आहेत.
कार्तिकी एकादशीनंतर सार्यांनाच वेध लागतात ते लग्नसराईचे. या लग्नसराईची सुरूवात होते ती तुळशीच्या लग्नाने (Tulsi Vivah). घरातल्या अंगणातील तुळशीचं लग्न लावणं हा सोहळा जितका आनंददायी असतो तितकाच मंगल विधी असतो. मग यामध्ये तुमच्या आसपासच्या लोकांना, नातेवाईकांना, आप्तांना आणि मित्रमंडळींना देखील समाविष्ट करून घ्या. यंदा सारेच सण कोरोना निर्बंधमुक्त वातावरणामध्ये साजरा केले जाणार आहेत. मग मागील दोन वर्षांची उरलेली कसर देखील यंदा भरून काढा. तुळशीचं लग्न यंदा दणक्यात साजरं करणार असाल तर तुमच्या प्रियजणांना WhatsApp Messages, SMS यांच्या माध्यमातून निमंत्रित करू शकता. मग निमंत्रण तुमच्या सोयीनुसार पाठवण्यासाठी तुळशीच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेच्या मेसेजचे हे नमूने देखील तुम्ही वापरू शकता.
तुळशीचं लग्न हे कार्तिक द्वादशी ते पौर्णिमा या काळात संध्याकाळी तिन्ही सांजेला लावले जाते. यंदा त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी चंद्र ग्रहण असल्याने काही जण 7 नोव्हेंबर पर्यंतच हा तुलसी विवाहाचा कार्यक्रम आटोपता घेण्याच्या तयारी मध्ये आहेत. नक्की वाचा: Tulsi Vivah Mangalashtak in Words: तुळशीचं लग्नं लावताना बिनचूक मंगलाष्टकं गाण्यासाठी इथे पहा त्याचे शब्द!
तुळशीच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका नमुना
नमुना 1:
॥श्री॥
आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक शुद्ध द्वादशी दिवशी अर्थात 5 नोव्हेंबर दिवशी सायंकाळी 7 वाजून 16 मिनिटांच्या मुहूर्तावर तुळशीचं लग्न पार पडणार आहे तरी सार्यांनी नटून थटून आमच्या तुळशीच्या लग्नाला या! हे आग्रहाचं आमंत्रण!
पत्ता-
------------
नमूना 2:
आमच्या तुळशीच्या लग्नाला नक्की या!
तारीख - 7 नोव्हेंबर
वेळ- सायंकाळी 7 वाजता
पत्ता -
-------------------
नमूना 3:
॥ तुळशीविवाह ॥
चि. विष्णू आणि चि.सौ.का. तुळशी
यांचा विवाहसोहळा आमच्या घरी रविवार, 6 नोव्हेंबर 2022 दिवशी आयोजित केला आहे. सायंकाळी 7 वाजण्याच्या शुभमुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे.
आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हं!
विवाहस्थळ: तुळशी वृंदावन
----------------------------
लक्ष्मीच्या रूपातील 'तुळस' आणि विष्णूच्या रूपातील 'शाळीग्राम' याचा विवाह सोहळा संपन्न होतो. एका सामान्य लग्नसोहळ्याप्रमाणेच तुळशीचा विवाह पार पडतो. दांपत्य जीवनात सुख नांदावे, घरातील मुलींना कृष्णाप्रमाणे मनाजोगा वर मिळावा या धारणेतून तुळशी विवाहाचा सोहळा दरवर्षी संपन्न होतो.