Tulsi Vivah 2021 Shubh Muhurat: तुळशी विवाह साठी पहा यंदाच्या तारखा, विवाह मुहूर्त काय?

तुलसीविवाह करिता तुळशीला नव्या नवरीप्रमाणे सजवून लग्न लावण्याची पद्धत आहे.

Tulsi Vivah | File Image

हिंदू धर्मामध्ये तुळशीला (Tulsi)  विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार तुलसी विवाह (tulsi Vivah) हा दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी दिवशी साजरा केला जातो. यंदा कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) म्हणजेच देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) ही 15 नोव्हेंबर दिवशी आहे. या दिवसापासून तुलसी विवाह साजरा केला जाऊ शकतो. कार्तिकी एकादशीला सारी धार्मिक सुरू होतात. चातुर्मासाचा (Chaturmas) काळ संपतो आणि पुन्हा मंगलपर्व सुरू होते. लग्नाळू तरूण-तरूणांच्या विवाहाचे देखील या तुलसी विवाहापासून बार उडवले जातात. मग पहा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या पावन पर्वामध्ये कधी पासून कधी पर्यंत यंदा तुलसी विवाह साजरा केला जाऊ शकतो?

तुलसी विवाह तारीख आणि मुहूर्त

यंदा तुलसी विवाह आरंभ 15 नोव्हेंबर पासून होणार असून 19 नोव्हेंबर दिवशी तुलसी विवाह समाप्ती आहे. त्यामुळे यंदा 15 ते 19 अशा 5 दिवसांमध्ये तुम्ही कधीही तुलसी विवाह सोहळा पार पाडू शकता. तुलसीविवाह करिता तुळशीला नव्या नवरीप्रमाणे सजवून लग्न लावण्याची पद्धत आहे. तुळशीचं लग्न लावणार्‍याला कन्यादानाचे पुण्य लाभते तसेच घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळतो अशी धारणा आहे. सर्वसाधारण तिन्ही सांजेच्या मुहूर्तावर तुळशीचं लग्न लावले जाते. नक्की वाचा: यंदा तुळशी विवाहासाठी तुळशीला कसे सजवाल ? Watch Video.

पुराणातील कथेनुसार, वृंदा नावाच्या एका मुलीचे लग्न असूरांचा राजा जालंधरशी झाले होते. तो अतिशय सामर्थ्यवान होता. मात्र तो दुष्ट होता आणि आपल्या शक्तीचा उपयोग तो वाईट कामांसाठी करत असे. त्याची पत्नी वृंदा ही विष्णुची एकनिष्ठ भक्त होती. जालंधरला नष्ट करण्यासाठी वृंदेची पतीव्रता मोडीत काढणे गरजेचे होते. म्हणून भगवान विष्णूने जालंधरचे रूप घेतले आणि तिची पतीव्रता मोडीत काढली. त्यानंतर भगवान शिवाला असूरांचा राजा जालंधरचा पराभव करण्यात यश आले.

वृंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला शालिग्राम नावाचा दगड बनण्याचा शाप दिला आणि स्वत: ला निर्जन केले. म्हणून भगवान विष्णूने तिला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळेच तुळशी विवाहानंतर तुळशीला देवीचे महत्त्व प्राप्त झाले आणि भगवान विष्णुला तुळस प्रिय आहे, असे मानले जावू लागले.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. त्यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत  नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif