Tulsi Vivah 2018 : तुळशी विवाह विशेष सोप्या रांगोळी डिझाईन्स (Video)
तुळशी विवाह विशेष रांगोळी डिझाईन्स Photo Credit : Instagram

Tulsi Vivah 2018 : आज दिवाळीची सांगता तुलसी विवाहाच्या (Tulsi Vivah) सोहळ्याने होणार आहे. दिव्यांची रोषणाई, आकाशकंदील, नवे कपडे यासोबतच रांगोळी हे दिवाळीच्या दिवसांमधील मोठं आकर्षण असतं. त्यामुळे दिवाळीच्या प्रत्येकदिवशी खास असणारी रांगोळी आज तुळशी विवाहाच्या दिवशी देखील स्पेशल असायलाच हवी. संध्याकाळी नववधूप्रमाणे तुळस सजावण्यापूर्वी घराच्या दारात, अंगणात आणि तुळशीसमोर रांगोळी काढणार असाल तर आज या तुळशी विवाह (Tulsi Vivah) स्पेशल रांगोळी डिझाईनच्या मदतीने तुमचं घर नक्की सजवा.Tulsi Vivah 2018: तुळशी विवाहाचा मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह ?

तुळशी विवाह विशेष रांगोळी डिझाईन्स

 

View this post on Instagram

 

#tulsivivahspecial #rangoli #tulsivivah2018 #tulsivivah #rangolibypoonamborkar

A post shared by Poonam Borkar (@poonamborkar) on

कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशीचं लग्न लावलं जातं. शाळीग्राम किंवा घरातील किशोरवयीन मुलांसोबत तुळशीचं लग्न लावण्याची प्रथा आहे. तुळशी विवाहानंतर लग्नसराईच्या मोसमाला सुरुवात होते.