Tukaram Beej 2023: संत तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे करा अभिवादन

या निमित्ताने तुम्ही सोशल मीडियावर आपल्या नातेवाईकांना तुकाराम बीजच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता, पाहा

Tukaram Beej 2023

Tukaram Bij 2023: फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले अशी धारणा असल्याने दरवर्षी वारकरी या तिथीला तुकाराम बीज साजरा करतात त्यामुळे  जगतगुरू अशी ओळख असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या भक्तांसाठी, आजचा दिवस महत्वाचा आणि खास असतो. महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरा संत तुकारामांनी उत्तर भारतापर्यंत पोहचवली. संत म्हणून तुकोबा यांनी आपल्या काव्यामधून, अभंगांमधून समाजातील दांभिकतेवर हल्लाबोल करत समाज परिवर्तन केले होते. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. संत तुकाराम बीज निमित्त Messages, Greetings, Facebook, Whatsapp Status द्वारे शुभेच्छा देऊन हा खास दिवस साजरा करा. या निमित्ताने तुम्ही सोशल मीडियावर आपल्या नातेवाईकांना तुकाराम बीजच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.

पाहा, 

Tukaram Beej 2023
Tukaram Beej 2023
Tukaram Beej 2023
Tukaram Beej 2023
Tukaram Beej 2023

तुकाराम बीजनिमित्त  पूजा, पालखी आणि कीर्तनांच्या कार्यक्रमांनी देहू नगरी उजळून निघते. आज तुकाराम यांच्या मंदिराला विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट केली आहे. अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करतात, कोरोना काळात अनेकांना दर्शन घेता आले नाही.