Dussehra 2024 Shubh Muhurta: आज देशभरात उत्साहात साजरा होतोय दसऱ्याचा सण; रावण दहन आणि पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
दशमी तिथी 12 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज सकाळी 10.58 वाजता सुरू होईल आणि 13 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या सकाळी 09.08 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार 12 ऑक्टोबरलाच दसरा साजरा केला जाणार आहे.
Dussehra 2024 Shubh Muhurat: अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा (Dussehra 2024) साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान रामाने रावणाचा वध करून माता सीतेला लंकेतून मुक्त केले होते. दरवर्षी या दिवशी लंकापती रावण, कुंभकरण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. हा सण उत्तर भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा 12 ऑक्टोबरला म्हणजेच आज दसरा साजरा होत आहे.
दसरा 2024 शुभ मुहूर्त (Dussehra 2024 Shubh Muhurat)
आज देशभरात दसऱ्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा होत आहे. दशमी तिथी 12 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज सकाळी 10.58 वाजता सुरू होईल आणि 13 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या सकाळी 09.08 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार 12 ऑक्टोबरलाच दसरा साजरा केला जाणार आहे. (Happy Dussehra 2024 Messages In Marathi: दसऱ्या निमित्त Greetings, Quotes, Wishes, WhatsApp Status द्वारे आप्तेष्टांना द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!)
दसरा पूजन शुभ मुहूर्त (Dussehra 2024 Puja Shubh Muhurat)
आज सकाळी 11.44 ते 12:30 पर्यंत पूजेची वेळ असेल. त्यानंतर, आज दुपारी 02:03 ते 02:49 या वेळतही तुम्ही दसरा पूजन करू शकता. दुपारच्या पूजेची वेळ म्हणजे देवी अपराजिताच्या पूजेची वेळ आज दुपारी 01:17 ते 03:35 पर्यंत असेल. (Happy Dussehra 2024 HD Images: दसऱ्या निमित्त Wishes, Greetings, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा विजयादशमीचा सण!)
रावण दहनाचा मुहूर्त (Ravan Dahan 2024 Muhurat)
प्रदोष काळात रावण दहन केले जाते. त्यामुळे रावण दहनाची वेळ आज संध्याकाळी 5.53 ते 7.27 अशी असेल.
दसरा पूजा विधी -
दसऱ्याच्या दिवशी पाटावर लाल रंगाचे कापड पसरून त्यावर भगवान श्रीराम आणि माँ दुर्गा यांची मूर्ती स्थापित करा. यानंतर तांदूळ हळदीने पिवळे करून स्वस्तिक स्वरूपात गणपतीची प्रतिष्ठापना करा. नऊ ग्रहांची स्थापना करा. आपल्या देवतेची पूजा करा, देवतांची स्थापन करून लाल रंगाची फुले अर्पण करा. यानंतर गुळाचे अन्न अर्पण करा. यानंतर जमेल तेवढे दान करा आणि गरिबांना भोजन द्या. धार्मिक ध्वज म्हणून विजय पताका तुमच्या पूजास्थानी लावा.
दसऱ्याचे महत्त्व -
विजयादशमीच्या दोन कथा खूप लोकप्रिय आहेत. पहिल्या कथेनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल दहाव्या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून लंकेवर विजयी ध्वज फडकावला होता. विजयादशमीच्या 20 दिवसांनी दिवाळीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर माता सीतेसोबत अयोध्येत परतले होते, असे म्हटले जाते. आणि दुसऱ्या कथेनुसार, विजयादशमीच्या दिवशी आदिशक्ती मां दुर्गा हिने दहा दिवस चाललेल्या भयंकर युद्धानंतर महिषासुर या राक्षसाचा वध केला होता. तेव्हापासून विजय दशमी साजरी करण्याची परंपरा सुरू असल्याचे सांगितले जाते.