Dhanteras 2022 Shopping Timing: देशभरात आज धनत्रयोदशी उत्साहात साजरी; सोन्या-चांदीची भांडी खरेदीसाठी शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजाविधी जाणून घ्या
याशिवाय अकाली मृत्यू टाळण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावला जातो. ज्याला यमाचा दिवा म्हणतात.
Dhanteras 2022 Shopping Timing: आज धनत्रयोदशी आहे. अंधारातून प्रकाशाचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेली दिवाळी 24 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. धनत्रयोदशीपासून पाच दिवस चालणाऱ्या दीपोत्सवाला सुरुवात होते. धनत्रयोदशीला शुभ खरेदी, भगवान धन्वंतरीची पूजा आणि यम दीपदान यांचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी धनत्रयोदशी शनिवार 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होईल आणि रविवार 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. अशा परिस्थितीत धनत्रयोदशीचा सण 22 आणि 23 ऑक्टोबर असे दोन दिवस साजरा केला जात आहे.
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. यावेळी तुम्हाला खरेदीसाठी पूर्ण दिवस मिळेल. याशिवाय धनत्रयोदशीला त्रिपुष्कर आणि सर्वार्थसिद्धी योगही तयार होत आहेत. या योगात शुभ कार्ये पूर्ण होतात आणि 3 पट फल प्राप्त होते. धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची नाणी, दागिने आणि भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी प्रदोष काळात भगवान धन्वंतीर, माता लक्ष्मी आणि कुबेर यांचीही पूजा केली जाते. याशिवाय अकाली मृत्यू टाळण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावला जातो. ज्याला यमाचा दिवा म्हणतात. (हेही वाचा - Dhantrayodashi 2022 Messages: धनत्रयोदशीच्या दिवशी खास मराठी Greetings, Images, Wishes पाठवून द्या आप्तेष्टांना शुभेच्छा)
धन त्रयोदशी तिथी आणि खरेदीचा शुभ मुहूर्त -
यावेळी 22 आणि 23 ऑक्टोबर असे दोन दिवस धनत्रयोदशीचा शुभ सण साजरा होत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. पंचांग गणनेनुसार, धनत्रयोदशी अर्थात कार्तिक महिन्याची त्रयोदशी 22 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 6.02 पासून सुरू होत आहे. 23 ऑक्टोबर 2022 रोजी त्रयोदशी तिथी संध्याकाळी 06.03 वाजता समाप्त होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करण्याबरोबरच शुभ वस्तू खरेदी करण्याचाही नियम आहे. अशा स्थितीत दोन्ही दिवशी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे.
धनत्रयोदशीला सोने, चांदी, भांडी खरेदीचे महत्त्व -
हिंदू कॅलेंडरनुसार, धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला भगवान धन्वंतरी यांचा जन्म समुद्रमंथनादरम्यान झाला होता. जन्माच्या वेळी भगवान धन्वंतरी हातात अमृताने भरलेला कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे देवतांचे प्रमाणक आणि आयुर्वेदाचे जनक मानले जातात. धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची नाणी, दागिने आणि भांडी इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय धनत्रयोदशीला भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा आणि जप केला जातो.