
देशात सर्वत्र सध्या दिवाळीची (Diwali 2022) धामधूम सुरु आहे. पाच दिवस साजरा होणाऱ्या या दिव्यांच्या उत्सवातील पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी (Dhanatrayodashi 2022). धनाचा वर्षाव करणाऱ्या धनत्रयोदशी दिवसाला दिपावलीत अनन्यसाधारण महत्व आहे. कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष त्रयोदशी धनत्रयोदशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला, म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. यंदा 22 ऑक्टोबर 2022 ला धनत्रयोदशी साजरी केली जाईल.
हिंदू मान्यतेनुसार, कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनामधून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी व भगवान कुबेर प्रकट झाले. धन्वंतरीनी देवांना अमृत देऊन अमर केले. म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची व धनलाभासाठी लक्ष्मी व कुबेराची पूजा केली जाते. (हेही वाचा: Diwali 2022: आता New York शहरातील शाळांना मिळेल दिवाळीची सार्वजनिक सुट्टी; महापौरांची मोठी घोषणा)
तर अशा या खास दिवशी मराठी Messages, Greetings, Quotes, HD Images, Wishes, Wallpapers शेअर करून तुम्ही तुमचे मित्र-मैत्रिणी, प्रियजन, नातेवाईकांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देऊ शकता.





धनत्रयोदशीच्या दिवशी वस्तू, दागिने, सोने व चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी या वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी येते असे मानले जाते. तसेच धनत्रयोदशीला धन म्हणजेच पैसे व सोने चांदी याची पूजा करून आपली व आपल्या कुटूंबाची प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे.