Teddy Day 2020 Gift Ideas: 'टेडी डे' निमित्त आपल्या जोडीदाराला द्या 'हे' खास गिफ्ट
या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी बियर भेट देण्याची पद्धत आहे. व्हॅलेंटाईन वीकमधील चौथा दिवस 'टेडी डे' म्हणून साजरा केला जातो. रोज प्रमाणे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला कोणत्या रंगाचा टेडी देता यावरून तुमच्या मनातील त्या व्यक्तीबाबतच्या भावना व्यक्त होत असतात. तुम्हीही तुमच्या जोडीदाराला या दिवशी गिफ्ट म्हणून टेडी बियर देण्याचा विचार करत असाल तर या लेखातील भन्नाट गिफ्ट आयडिया नक्की ट्राय करा.
Teddy Day Gift Ideas 2020: 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा आठवडा 'व्हॅलेंटाईन वीक' म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यात रोज डे (Rose Day), प्रपोज डे (Propose Day), चॉकलेट डे (Chocolate Day), टेडी डे (Teddy Day), प्रॉमिस डे (Promise Day), हग डे (Hug Day), किस डे (Kiss Day) आणि व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरे केले जातात. प्रेमी युगलांसाठी हा आठवडा खास असतो. या आठवड्यातील प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी एक प्रकारची परवणीच असतो.
यंदा 10 फेब्रुवारीला टेडी साजरा केला जाणार आहे. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी बियर भेट देण्याची पद्धत आहे. व्हॅलेंटाईन वीकमधील चौथा दिवस 'टेडी डे' म्हणून साजरा केला जातो. रोज प्रमाणे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला कोणत्या रंगाचा टेडी देता यावरून तुमच्या मनातील त्या व्यक्तीबाबतच्या भावना व्यक्त होत असतात. तुम्हीही तुमच्या जोडीदाराला या दिवशी गिफ्ट म्हणून टेडी बियर देण्याचा विचार करत असाल तर या लेखातील भन्नाट गिफ्ट आयडिया नक्की ट्राय करा. (हेही वाचा - Valentine Week 2020: व्हॅलेंटाईन विकमधील प्रत्येक दिवसाचं काय आहे महत्त्व? का साजरा करतात रोज, प्रपोज, चॉकलेट, टेडी, प्रॉमिस, हग, किस डे?)
'टेडी डे'च्या निमित्ताने आपल्या जोडीदाराला द्या 'हे' खास टेडी गिफ्ट -
रेड टेडी (Red Teddy)
लाल रंग हा प्रेमाचे प्रतिक मानला जातो. त्यामुळे तुम्ही टेडी डे च्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला लाल रंगाचा टेडी बियर देऊ शकता. त्यामुळे तुमच्या मनातील भावना तुमच्या जोडीदारापर्यंत पोहचण्यास मदत होईल. तुम्ही रेड टेडी देऊन तुमच्या प्रियकरांचे मन जिंकू शकता.
पिंक टेडी (Pink Teddy)
पिंक रंग हा मुलींचा आवडता रंग आहे. तसेच सध्या फेब्रुवारी महिना सुरू असून सर्वत्र गुलाबी थंडी जाणवत आहे. अशा गुलाबी थंडीत तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्यासाठी पिंक टेडी मोठं गिफ्ट ठरेल.
प्रेमाला लावा स्व: निर्मितीची झालर -
बाजारात तुम्हाला विविध प्रकारचे टेडी बियर पाहायला मिळतील. पंरतु, तुम्ही जर तुमच्या जोडीदाराला स्वत: च्या हाताने बनवून तयार केलेला टेडी गिफ्ट केला तर त्याला तो अधिक आवडेल. विशेष म्हणजे तुम्ही दिलेला हा टेडी जगात कोठेही मिळणार नाही. त्यामुळे तुमची प्रियसी किंवा प्रियकर अधिक प्रभावित होईल.
टेडीवर लिहा प्रेमाचे नाव -
बाजारात अनेक टेडी बियर मिळतात. परंतु, या टेडीवर जर तुम्ही तुमच्या प्रियकराचं नाव लिहलं तर आणखी उत्तम होईल. प्रियकराचं नाव लिहल्याने तो टेडी अधिक आकर्षक आणि इतरांपेक्षा वेगळा दिसेल.
टेडी बॅग -
टेडी डे च्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदाराला टेडी बॅग देऊ शकता. ही टेडी बॅग तुमच्या प्रियकराला किंवा प्रियसिला दररोजच्या वापरात उपयोगी पडेल. तुमचं हे गिफ्ट सर्वांपेक्षा हटके ठरू शकतं. तसचं हे तुमच्या प्रियकराला प्रभावित करू शकतं.
टेडी मोबाईल कव्हर -
'टेडी डे' च्या दिवशी सर्वजण आपल्या जोडीदाराला टेडी बियर गिफ्ट करतात. परंतु, तुम्ही जर आपल्या प्रियकराला टेडी न देता टेडीचं चित्र असणार मोबाईल कव्हर गिफ्ट केलं तर ते जास्त प्रभावित ठरू शकतं. मुलींना असे कव्हर खूप आवडतात. त्यामुळे प्रियसिला टेडी डेच्या दिवशी हे गिफ्ट देण खास ठरू शकतं.
अंगावर बदाम असलेला टेडी -
बदाम हे प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे ज्या टेडीवर बदाम असेल असा टेडी तुम्ही तुमच्या प्रियकराला देऊ शकता. असे केल्यास तुमच्या भावना तुमच्या जोडीदारापर्यंत पोहचतील. हे बदाम लाल रंगाचे असल्यास तुमची प्रियसी किंवा प्रियकर आणखी प्रभावित होईल.