Sankashti Chaturthi 2019: संकष्टी चतुर्थी उपवास सोडण्यापूर्वी पहा श्रीमंत दगडूशेठ गणपती ची लाईव्ह आरती

अनेक गणेशभक्त संकष्टीला चंद्रोदयाच्या मुहूर्तावर आरती करून आजचा उपवास सोडू शकता

Dagadusheth Halwai Ganpati Temple (Photo Credits: ANI)

Shreemant Dagadusheth Halwai Ganapati Live Sankashti Chaturthi 2019Aarti:  गणेश भक्तांसाठी संकष्टी चतुर्थी हा दर महिन्याला येणारा खास दिवस आहे. आज (15 नोव्हेंबर) दिवशी या महिन्यातील संकष्टी चतुर्थी साजरी करण्यात आली आहे. गणेश भक्त संकष्टीचा उपवास रात्री चंद्रोदयाच्या वेळेस सोडतात. आज चंद्रोदयाची वेळ रात्री 8 वाजून 23 मिनिटांची आहे. त्यामुळे तुम्हांला आज बाप्पाचं दर्शन घेता आलं नसेल तर डिजिटल मीडीयाच्या आजच्या या युगात तुम्ही घरबसल्या बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. इंटरनेट मुळे घरसबसल्या कुठेही बसून पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ हलवाई बाप्पाचं दर्शन घेणं शक्य आहे. त्यामुळे आजच्या संकष्टी निमित तुम्हांला घरबसल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर ते सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्या अधिकृत वेब पेजच्या माध्यमातून घेणं शक्य आहे. आज संकष्टी चतुर्थी च्या निमित्त तुम्ही घरबसल्या बाप्पाच्या आरतीचा लाभ घेऊ शकता. अनेक गणेशभक्त संकष्टीला चंद्रोदयाच्या मुहूर्तावर आरती करून आजचा उपवास सोडू शकता. Sankashti Chaturthi 2019: संकष्टी चतुर्थीनिमित्त 'अशी' करा पूजा, जाणून घ्या श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे उपाय.

इथे पहा श्रीमंत दगडू शेठ गणपतीची आरती

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यास सुख-समृद्धी, शांती लाभते. तसेच श्रीगणेश आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येकाला संपूर्ण विधीने श्रीगणेशाची पूजा करणे आवश्यक आहे. चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करुन चंद्राला गंध, पाणी, अक्षता, फुले वाहावी. त्यानंतर श्रीगणेशाच्या मुर्तीवर सिंदूर लावा आणि 'ॐ गं गणपतेय नम:' या मंत्राचा जप करत 21 दुर्वा अर्पण करा. बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने गणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. तसेच आपल्या घरात नेहमी सुख, समृद्धी आणि शांती नांदते. आज संपूर्ण राज्यात संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवले जाते.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास सल्ला समजू नये. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)