Shree Swami Samarth Prakat Din 2025 Wishes: श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त खास Messages, WhatsApp Status, HD Images द्वारे द्या शुभेच्छा

अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन आज सव्वाशेहून अधिक वर्षे उलटून गेली; परंतु त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतचआहे.

Shree Swami Samarth Prakat Din 2025 Wishes

Shree Swami Samarth Prakat Din 2025 Wishes in Marathi: श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार म्हणजे थोर सत्पुरुष श्री स्वामी समर्थ (Shree Swami Samarth) अर्थात अक्कलकोट स्वामी. श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन (Shree Swami Samarth Prakat Din 2025) तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सोमवार 31 मार्च रोजी हा प्रकट दिन वा जयंती महोत्सव आहे. अशी अशी मान्यता आहे की, गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. ‘मी नृसिंह भान असून श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे’, हे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात.

स्वामी समर्थांनी भारतभर भ्रमण केले आणि अखेरीस महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्थायिक झाले. तेथे त्यांनी 22 वर्षे वास्तव्य केले आणि अनेक भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांच्या अध्यात्मिक शक्तींमुळे ते प्रसिद्ध होते. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा दरवर्षी साजरा केला जाणारा विशेष दिवस आहे. महाराष्ट्रातील अनेक भक्त या दिवशी स्वामींच्या उपासनेत सहभागी होतात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा भक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे, ज्याद्वारे ते स्वामींच्या शिकवणींचे स्मरण करतात आणि त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ घेतात.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त खास Messages, Wishes, WhatsApp Status, HD Images आणि स्वामी समर्थ स्टेटस मराठी द्वारे शुभेच्छा पाठवून साजरा करा हा खास दिन.

Shree Swami Samarth Prakat Din 2025 Wishes
Shree Swami Samarth Prakat Din 2025 Wishes
Shree Swami Samarth Prakat Din 2025 Wishes
Shree Swami Samarth Prakat Din 2025 Wishes
Shree Swami Samarth Prakat Din 2025 Wishes
Shree Swami Samarth Prakat Din 2025 Wishes

दरम्यान, श्री नृसिंह सरस्वती ह्यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर आंध्रप्रदेशातील श्री शैल्यम क्षेत्राजवळ कर्दळीवनात अदृश्य झाले. पुढे 300 वर्षानंतर अक्कलकोटचे स्वामी समर्थ प्रकट झाले. इ.स. 1856 साली स्वामी अक्कलकोट येथे अवतरले त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. श्री स्वामींनी जो उपदेश केला त्यात नामस्मरणाला सर्वाधिक महत्त्व दिले. अनन्यभावाने माझी सेवा कर, मी तुझा योगक्षेम चालवेन या गीतोक्ती पुनरुच्चार करून स्वामींनी नामस्मरणाची अखंड माळ (नामजप, नामतप, नामयोग) भक्ती चालू ठेवावी हाच महाबोध सांगितला आहे. (हेही वाचा: Ram Navami 2025 Date: जाणून घ्या यंदा कधी आहे रामनवमी; या दिवसाचे महत्व व मध्याह्न मुहूर्त)

‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, हे त्यांचे आश्वासनही नामजप करताक्षणी तुझ्या सन्मुख आहे हेच भक्तितत्त्व सांगते. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन आज सव्वाशेहून अधिक वर्षे उलटून गेली; परंतु त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतचआहे.

Share Now

Tags

Swami Samarth Prakat Din Status Swami Samarth Prakat Din Banner Swami Samarth Prakat Din Shubhechha Swami Samarth Prakat Din Wishes In Marathi Swami Samarth Prakat Din Swami Samarth Swami Samarth Prakat Din 2025 स्वामी समर्थ wami Samarth Prakat Din Date Swami Samarth Prakat Din 2025 Date Swami Samarth Prakat Din Tithi Akkalkot Akkalkot Swami Samarth Prakat Din अक्कलकोट अक्कलकोट स्वामी समर्थ स्वामी समर्थ प्रकट दिन Swami Samarth Photo Swami Samarth Prakat Din Images Swami Samarth Prakat Din wallpapers Swami Samarth Prakat Din WhatsApp Status Swami Samarth Quotes In Marathi श्री स्वामी समर्थ प्रकट दिन श्री स्वामी समर्थ फोटो स्वामी समर्थ कोट्स स्वामी समर्थ प्रकट दिन WhatsApp स्टेटस स्वामी समर्थ प्रकट दिन प्रतिमा स्वामी समर्थ प्रकट दिन वॉलपेपर स्वामी समर्थ प्रकट दिन संदेश स्वामी समर्थ फोटो स्वामी समर्थ फोटो वॉलपेपर स्वामी समर्थ मराठी कोट्स स्वामी समर्थ स्टेटस मराठी Swami Samarth Prakat Din Images 2025 Swami Samarth Prakat Din messages Swami Samarth Prakat Din quotes Swami Samarth Prakat Din Wishes स्वामी समर्थ प्रकट दिन ईमेज स्वामी समर्थ प्रकट दिन कोट्स स्वामी समर्थ प्रकट दिन फोटोज स्वामी समर्थ प्रकट दिन मराठी संदेश स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा स्वामी समर्थ संदेश
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement