Shree Shankar Maharaj Prakat Din 2023 Date: उद्यापासून पुण्यातील मठात साजरा होणार श्री शंकर महाराज यांचा प्रगट दिन सोहळा; अनेक कार्यक्रमांचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर
महाराजांनी त्यांच्या भक्तांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. महाराज जिथे-जिथे गेले तिथे-तिथे त्यांनी आपल्या भक्तांना भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरी, दासबोध, गुरुचरित्र यांसारख्या धार्मिक-तात्त्विक ग्रंथांचे (पारायण) वाचन किंवा सण किंवा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रेरित केले.
योगीराज श्री शंकर महाराज (Shree Shankar Maharaj) हे नाथ सिद्धांच्या परंपरेतील एक परिपूर्ण गुरु आणि आधुनिक युगातील महाराष्ट्रातील महान योगी संतांपैकी एक होते. श्री शंकर महाराज योगीराज होते, याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे. ते स्वत: मात्र नेहमी म्हणत, ‘सिद्धीच्या मागे लागू नका!’ मात्र त्यांनी आपले योगसामर्थ्य कळत-नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. दाढी असणारे, निरागस भाव डोळ्यात असणारे आणि गुडघे मुडपून बसलेले एक तेजस्वी पुरुष अशी त्यांची ओळख. यंदा 18 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीमध्ये शंकर महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा होणार आहे. या काळात त्यांच्या पुण्यातील मठामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव काळात रोज पहाटे श्री. गणेश मावडीकर आणि सहकारी यांचे सनई नगारा वादन संपन्न होईल. तसेच प्रवचनकार ह.भ.प. स्वामी शंकरनाथ महाराज (आळंदी) यांचे दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 5.30 पर्यंत श्री सद्गुरु शंकर महाराज संत वांग्मय व आपण या विषयावर प्रवचन होणार आहे.
या काळात दररोज सायंकाळी 7 ते 9.30 या काळात महाप्रसादाचे आयोजन केले आहे. अभिषेक, त्रिकाळ-आरती, महाप्रसाद नेहमीच्या वेळेला संपन्न होईल. तसेच रोज रात्री 8 वाजता श्री सद्गुरु शंकर महाराज भजनी मंडळाचे भजन संपन्न होईल.
भक्तांना देणगी द्यावयाची असल्यास, सदर देणग्या ट्रस्टच्या ऑफिस मध्ये स्वीकारल्या जातील. आपल्या सोयी करता बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत रोख अथवा चेक ने खालील खाते क्र. टाकून देणग्या बँकेत जमा करू शकता.
तपशील- श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्ट बँक ऑफ इंडिया लक्ष्मी रोड, पुणे
खाते क्र. 050510110007533+ आय. एफ. सी. कोड. BKID0000505
श्रींच्या प्रगटदिन सोहळ्या निमित्त समाधी दर्शन दि 18 नोव्हेंबर 2023 ते दि 20 नोव्हेंबर 2023 यादरम्यान 24 तास सुरु राहील. मंगळवारी 21 नोव्हेंबर रोजी दुपारच्या आरती नंतर, प्रक्षाळ पूजा होऊन, मठ दर्शनाला बंद होईल व दुस-या दिवशी सकाळी 6 वाजता सुरू होईल.
दरम्यान, महाराजांच्या जन्माच्या तीन वेगवेगळ्या आवृत्त्या आहेत. काही ठिकाणी म्हटले आहे की, ते नाशिकजवळील सटाणा तालुक्यातील अंतापूर गावातील चिमणाजी नावाच्या निपुत्रिक व्यक्तीला सापडले. दुसरीकडे म्हटले आहे की, मराठवाड्यातील बीड-परभणी भागातील एका गावातील निपुत्रिक स्त्रीला ते सापडले. तिसरी आवृत्ती महाराजांचे प्रमुख शिष्य डॉ. नागेश धनेश्वर यांच्या चरित्रात वर्णन केलेली आहे, ज्यानुसार त्यांचा जन्म मंगळवेढे येथे 1800 च्या सुमारास उपासनी नावाच्या कुटुंबात झाला.
महाराज दिसायला शारीरिकदृष्ट्या विकृत होते. त्याचे वर्णन अनेकदा अष्टवक्र (म्हणजे आठ ठिकाणी वाकलेले) असे केले जाते. ते लहान असताना 'अजानुबाहू', म्हणजेच गुडघ्यापर्यंत लांब हात असलेले होते. त्यांच्या हातात बऱ्याचदा ब्रँडीची बाटली एक चाबूक असायचा. या दोन्ही गोष्टी एखाद्या योगीसाठी असामान्य आहेत. महाराज ज्या एका उद्देशाने दारू प्यायचे, त्यातील एक म्हणजे नको असलेल्या लोकांना दूर ठेवणे. ज्यांनी महाराजांना बाह्य दर्शनी पलीकडे पाहिले तेच त्यांच्याकडे येऊ शकत होते. महाराजांना अंगठ्या आणि दागिने घालण्याची आवड होती, परंतु त्या ते इतरांना देत असत. महाराजांना 13 क्रमांक (हिंदीत तेरा) आवडायचा. 'सब कुछ तेरा, कुछ नही मेरा', म्हणजे 'सर्व काही तुझे आहे आणि माझे काहीही नाही' असे ते म्हणत असत. (हेही वाचा: Pandav Panchami 2023 Date: यंदा 18 नोव्हेंबर रोजी साजरी होणार 'पांडव पंचमी'; जाणून घ्या काय आहे महत्व आणि आख्यायिका)
महाराजांनी त्यांच्या भक्तांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला. महाराज जिथे-जिथे गेले तिथे-तिथे त्यांनी आपल्या भक्तांना भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरी, दासबोध, गुरुचरित्र यांसारख्या धार्मिक-तात्त्विक ग्रंथांचे (पारायण) वाचन किंवा सण किंवा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रेरित केले. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी स्वामींच्या सूचनेनुसार हिमालयाची तीर्थयात्रा केली. साधारण 1878 नंतर कधीतरी (श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतली त्या वर्षी) महाराज महाराष्ट्रात परतले.
भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी 26 एप्रिल 1947 रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. सदगुरू शंकर महाराजांनी भक्तांना त्या-त्या भागात दर्शन दिले तिथे आता मंदिरे आहेत व सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)