Shravan Maas 2022 Sankashti Chaturthi: यंदा 15 ऑगस्टला श्रावणातली संकष्टी चतुर्थी; पहा चंद्रोदयाच्या वेळा
या निमित्ताने गणपती बाप्पाचं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात.
हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना (Shravan Maas) हा खास महिना आहे. धार्मिक दृष्ट्या पवित्र असलेल्या या महिन्यात अनेक व्रत वैकल्यांची रेलचेल असते. श्रावण महिना आणि त्यामध्ये संकष्टी चतुर्थी यामुळे गणेशभक्तांमध्ये खास उत्साह असतो. यंदा हा योगायोग भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्टला आला आहे. वद्य पक्षातील चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) म्हणून साजरी केली जाते. अनेक भाविक या निमित्ताने दिवसभर उपवास करतात. रात्री चंद्रोदयानंतर बाप्पाच्या पूजा अर्चनेनंतर व्रताची सांगता करतात. त्यामुळे संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ महत्त्वाची असते.
प्रत्येक शहरानुसार चंद्रोदयाच्या वेळेमध्ये काही मिनिटांचा फरक असतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या शहरामध्ये आहात यावर तुमच्या व्रत सोडण्याच्या वेळेमध्ये बदल होऊ शकतो. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मोदकांचा खास बेत केला जातो. यंदा 15 ऑगस्ट आणि संकष्टीचा योग जुळून आल्याने तिरंगी मोदकांचा बेत आहे? मग पहा ते कसे कराल?
शहरानुसार चंद्रोदयाची वेळ काय?
मुंबई - 21.44
पुणे- 21.40
नाशिक - 21.40
रत्नागिरी- 21.42
नागपूर- 21.18
गोवा- 21.40
बेळगाव- 21.38
संकष्टीच्या दिवशी गणपतीची विशेष रुपाने पूजा केल्यास नकारात्मक प्रभाव दूर होतात. गणपती घरातील सर्व समस्या दूर करतो असे ही म्हणतात. त्यामुळे जो व्यक्ती आजच्या दिवशी व्रत ठेवतो आणि पूर्ण आस्थेसह पूजा करतो त्याचा गणपती प्रसन्न होऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर हे व्रत सूर्योदयापासून सुरु होते आणि चंद्र दर्शनानंतर पूर्ण होते. महिन्यातून एकदा येणारी संकष्टी अनेक गणेशभक्त आवर्जुन पाळतात. या निमित्ताने गणपती बाप्पाचं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात.
(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. त्याची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)