Goa Liberation Day 2023 Messages: गोवा मुक्ती दिनानिमित्त WhatsApp Status, Images, Wallpapers शेअर करत द्या खास दिवसाच्या शुभेच्छा!

तसेत या गोवा मुक्तीसंग्रामात हुतात्मा झालेल्यांना विनम्र अभिवादन करू शकता.

Goa Liberation Day 2023 Messages (Photo Credit- File Image)

Goa Liberation Day 2023 Messages: भारतात दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन (Goa Liberation Day) साजरा केला जातो. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही गोवा 14 वर्षे पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोव्यात देखील स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या. गोव्याला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. गोवा मुक्तीसाठी भारताने राजनैतिक माध्यमांद्वारे शांततापूर्ण प्रयत्न केले.

तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Prime Minister Jawaharlal Nehru) यांनी गोव्यात सशस्त्र सेना पाठवली. त्यानंतर पोर्तुगीजांनी (Portuguese) शरणागती पत्करली आणि गोवा 19 डिसेंबर 1961 रोजी मुक्त झाला. त्यानंतर गोवा भारतीय संघराज्यात जोडला गेला आणि दमण आणि दीवसह भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला. गोवा मुक्ती दिनानिमित्त WhatsApp Status, Images, Wallpapers शेअर तुम्ही हा दिवस आणखी खास बनवू शकता. तसेत या गोवा मुक्तीसंग्रामात हुतात्मा झालेल्यांना विनम्र अभिवादन करू शकता. (हेही वाचा - भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 14 वर्षांनी गोवा झाला होता मुक्त; अवघ्या 36 तासात पोर्तुगीजांनी पत्करली होती शरणागती, जाणून इतिहास)

गोवा मुक्ती दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

या दिवसाचे आपण मोठ्या अभिमानाने स्मरण करूया

आणि ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य व मुक्ती

मिळवून दिली त्यांचे आभार मानूया!!!

Goa Liberation Day 2023 Messages (Photo Credit- File Image)

गोवा मुक्ती दिनानिमित्त आपण

त्या सर्व लोकांचे स्मरण करूया,

ज्यांनी गोवा मुक्त करण्यासाठी

आपल्या प्राणांची आहुती दिली.

गोवा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा.!!

Goa Liberation Day 2023 Messages (Photo Credit- File Image)

19 डिसेंबर 1961 रोजी गोवा

पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाला.

या दिवशी खऱ्या अर्थाने भारताला

युरोपियन राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.

गोवा मुक्ती दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Goa Liberation Day 2023 Messages (Photo Credit- File Image)

आपल्या पूर्वजांनी आपली भूमी मुक्त करण्यासाठी

मोठी किंमत मोजली आहे.

त्यामुळे आपण स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या

प्रत्येत हुतात्म्याप्रति ऋनी आहोत...

गोवा मुक्ती दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Goa Liberation Day 2023 Messages (Photo Credit- File Image)

गोवा अशीच प्रगती करत राहो

आणि वैभवाच्या नव्या उंचीला स्पर्श करत राहो...

हीच गोवा मुक्ती दिनी प्रार्थना...

गोवा मुक्ती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Goa Liberation Day 2023 Messages (Photo Credit- File Image)

गोवा हे 1987 पर्यंत केंद्रशासित प्रदेश राहिले. त्यानंतर गोव्याला भारताचे 25 वे राज्य बनून राज्याचा दर्जा देण्यात आला. पोर्तुगीजांनी गोव्यावर 450 वर्षांहून अधिक काळ राज्य केले. अखेर 1961 मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif