 
                                                                 Ganesh Chaturthi 2024 Invitation Card In Marathi: गणेश चतुर्थीचा 10 दिवसांचा उत्सव आजपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हा सण बुद्धी आणि ज्ञानाची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान गणेशाच्या जन्माचे प्रतीक आहे. याला 'विनायक चतुर्थी' असेही म्हणतात. असे मानले जाते की, या दिवशी कठोर उपवास केल्याने सुख आणि समृद्धी मिळते. आज घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे. अनेकांनी गणपत्ती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे.
अशातचं आता तुम्हाला तुमच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तुमच्या नातेवाई, मित्र-परिवारास दर्शनास बोलवायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास निमंत्रण पत्रिका (Ganesh Chaturthi 2024 Invitation Card) घेऊन आलो आहोत. या आमंत्रण पत्रिका तुम्ही सोशल मीडियावर पाठवून तुमच्या मित्र-परिवारास गणपतीचे दर्शन घेण्यासाठी घरी आमंत्रित करू शकता. (वाचा - Ganesh Visarjan 2024 Dates: गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत 1.5, 3, 5, 7, 10 दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त घ्या जाणून)
गणेशोत्सव मराठी आमंत्रण पत्रिका -
यंदा आमच्या घरी दहा दिवस गणरायाचं आगमन होणार आहे. या निमित्ताने आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी नक्की या. बाप्पाच्या दर्शनासाठी आग्रहाचे निमंत्रण.
आपला नम्र -
पत्ता -
फोन नंबर -
 
|| श्री गणेशाय नम: || दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे 10 दिवसांसाठी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटूंब आणि सहपरिवार गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी यावे. हे आग्रहाचे आमंत्रण
|| गणपती बाप्पा मोरया ||
 
|| श्री गणेशाय नम: ||
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्याकडे दिनांक 07 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2023 या 5 दिवसांसाठी बाप्पाचे आगमन होणार आहे. गौराईचे आगमन: 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2023 तरी आपण सर्वांनी सहकुटूंब-सहपरिवार बाप्पाच्या दर्शनासाठी यावे असे आग्रहाचे आमंत्रण निमंत्रक.
गणपती बाप्पा मोरया
पत्ता -
वेळ -
 
|| श्री गणेशाय नम: ||
आग्रहाचे आमंत्रण आमच्या येथे गणपती बाप्पा 10 दिवसांसाठी विराजमान झाले आहेत. तरी आपण सर्वांनी येऊन गणरायाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती. गणपती बाप्पा मोरया...
पत्ता -
वेळ -
 
|| श्री गणेशाय नम: ||
यंदा गणरायाचं पहिल्यांदाच आमच्या घरी आगमन होत आहे. मंगलमय गणेशोत्सवात लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आपण अगत्यानं यावं.
आपल्या प्रतीक्षेत...
पत्ता -
वेळ -
 
|| श्री गणेशाय नम: || दरवर्षी प्रमाणे यंदाही आमच्या घरी 07 सप्टेंबर 2023 रोजी लाडक्या बाप्पाचे 10 दिवसांसाठी आगमन होणार आहे. तरी आपण सहकुटुंब आणि सहपरिवार गणपतीच्या दर्शनासाठी यावे.
आपला नम्र
पत्ता -
वेळ -
 
वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी सोमवार, 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3:10 वाजता सुरू होईल. ही तारीख मंगळवार, 17 ऑगस्ट रोजी रात्री 11:44 वाजता संपेल. अशा स्थितीत 17 सप्टेंबर रोजी उदयतिथीनुसार अनंत चतुर्दशी साजरी होणार आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
