Shakambari Navratri 2020 Wishes and Images: शाकंभरी नवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers शेअर करुन द्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा!

नवरात्रीच्या आज पहिल्या दिवशी शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक मेसेंजरच्या माध्यमातून शेअर करून या नवरात्रीचा आनंद द्विगुणीत करा.

Shakambari Navratri 2020 | File Photo

Happy Shakambari Navratri 2020 Images: शारदीय नवरात्रीप्रमाणेच महाराष्ट्रसह देशभरात आज (3 जानेवारी) पासून शाकंभरी नवरात्र (Shakambari Navratri) उत्सवाला सुरूवात झाली आहे. पौष महिन्यात साजरी केल्या जाणार्‍या या नवरात्रीमध्येही भाविक आदिशक्तीचं दर्शन घेतात. देशभरात देवीचे उत्सव साजरे केले जातात. 10 जानेवारी पर्यंत चालणार्‍या या शाकंभरी नवरात्रीची सांगता शाकंभरी पौर्णिमेने होणार आहे. मग या पावनपर्वच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या परिवारातील लोकांना, मित्र परिवाराला देऊन त्यांचादेखील दिवस खास बनवा. नवरात्रीच्या आज पहिल्या दिवशी शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक मेसेंजरच्या माध्यमातून शेअर करून या नवरात्रीचा आनंद द्विगुणीत करा.

शाकंभरी नवरात्रीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात तुळजाभवनीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. आज 3 जानेवारीला दुपारी 12 च्या सुमारास शाकंभरी देवीच्या नवरात्रोत्सवाला घटस्थापना करून सुरूवात होणार आहे. Shakambari Navratri 2020: शाकंभरी नवरात्रोत्सव तारीख, शुभ मुहूर्त, व्रत कथा आणि महत्त्व.

शाकंभरी नवरात्री शुभेच्छा

 

Shakambari Navratri 2020 | File Photo
Shakambari Navratri 2020 | File Photo
Shakambari Navratri 2020 | File Photo
Shakambari Navratri 2020 | File Photo
Shakambari Navratri 2020 | File Photo

 

पौष शुक्ल सप्तमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरे केले जाते. शाकंभरी देवीची पूजा करण्याबरोबरच आपण जर आपल्या परिसरांत स्वत:च पालेभाज्या निर्माण करून त्या जर भोजनात वापरल्या तर शाकंभरी देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि पुढच्या नव्हे, तर याच जन्मात आपल्या शरीराचे व मनाचे आरोग्य चांगले राहते अशी धारणा आहे.