Savitribai Phule Jayanti Quotes: सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्त Greetings, WhatsApp Status, Wallpapers शेअर करत पुढील पिढीपर्यत पोहचवा सावित्रींच्या विचारांचा वारसा
ज्या तुम्ही तुमच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करु शकता आणि पुढल्या पिढीपर्यत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे विचार पोहचवू शकता.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले. सावित्रीबाई या लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला बालिका दिन किंवा महिलामुक्ती दिन म्हणुन देखील साजरा करण्यात येतो. दरवर्षी ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली जाते. तरी देशाच्या या धाडसी लेकीच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही डिजीटल पोस्ट घेवून आलो आहोत. ज्या तुम्ही तुमच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करु शकता आणि पुढल्या पिढीपर्यत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे विचार पोहचवू शकता.
1. समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी
शाळेची पायरी चढून कायमची दार उघडणारी
2. तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई,
तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई!
3. लेकींच्या स्वप्नांची कोमेजू न देणारी फुले;
तू तर आहेस शिक्षण घेणारी व देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले!
4. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी एक क्रांती ज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले!
5. घडलो नसतो मी जर शिकली नसती माली माय,