Sardar Vallabhbhai Patel Punyatithi 2022: सरदार वल्लभभाई पटेल यांचे Quotes शेअर करत पुढील पिढीपर्यंत पोहचवा त्यांच्या विचारांचा वारसा!
पेशाने वकील असलेले वल्लभभाई पटेल महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरित झाले आणि स्वातंत्र्यलढ्यामध्ये उतरले.
भारताचे लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांचे योगदान भारत देशाला अखंड ठेवण्यामध्ये बहुमोलाचे आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून जबाबदारी निभावली होती. देशात 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे विलीनीकरण करवून घेण्याचे मोठे कार्य त्यांनी निभावलं आहे. मुत्सद्देगिरी आणि वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने भारतात विलीन केली. आज (15 डिसेंबर) त्यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांचे विचार सोशल मीडीयात शेअर करून त्यांना अभिवादन करण्यासाठी हे त्यांचे खास कोट्स!
सरदार वल्लभभाई पटेल यांचे कोट्स सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Messages, Wishes, HD Images द्वारा शेअर करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत देखील शेअर करू शकता. नक्की वाचा: Statue of Unity अवकाशातून कसा दिसतो? (Photo).
पहा वल्लभभाई पटेल यांचा विचार
सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन 15 डिसेंबर 1950 दिवशी झाले. पेशाने वकील असलेले वल्लभभाई पटेल महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरित झाले आणि स्वातंत्र्यलढ्यामध्ये उतरले. भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान असलेले वल्लभभाई पटेल हे अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.