Sankashti Chaturthi Moonrise Timing For Today: आज संकष्टी चतुर्थी दिवशी जाणून घ्या तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ काय?

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या नैवेद्याला साग्र संगीत जेवण केले जाते. बाप्पाच्या आवडीच्या मोदकाची मेजवानी असते.

Happy Sankashti Chaturthi | File Image

फेब्रुवारी महिन्यातील संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आज 28 फेब्रुवारी दिवशी आहे. दर महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थीचा दिवस हा संकष्टी चतुर्थीचा असतो. गणपती वर श्रद्धा असलेल्या भाविकांसाठी हा दिवस खास असतो. गणरायाकडे भाविक दु:खांचा नाश करणारा आणि सुख, समृद्धीची भरभराट करणारा म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे आयुष्यात दु:खांचा नाश व्हावा या प्रार्थनेसह अनेक जण संकष्टी चतुर्थी दिवशी गणरायाची पूजा करतात. संकष्टी चतुर्थीला एक दिवसाचा उपवास करण्याची देखील प्रथा आहे. अनेकजण या निमित्ताने गणरायाची पूजा करून मनोकामना पूर्ण करण्यासाठी दिवसभर उपवास करतात. या उपवासाची सांगता संध्याकाळी चंद्रोदयानंतर करण्याची रीत आहे. त्यामुळे तुम्ही देखील आज संकष्टी चतुर्थीचा उपवास करणार असाल तर त्याची सांगता तुमच्या शहरातल्या चंद्रोदयाच्या वेळेला करणार असाल तर जाणून घ्या काय कोणत्या शहरामध्ये कधी होईल चंद्रोदय?

महत्त्वाच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ?

मुंबई - 21.49

पुणे - 21.44

नाशिक - 21.46

नागपूर -21.24

कोल्हापूर - 21.41

औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) -21.39

गोवा - 21.42

बेळगाव - 21.39

( नक्की वाचा: Dwijapriya Sankashti Chaturthi 2024: द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या, त्याचे आध्यात्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत).

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या नैवेद्याला साग्र संगीत जेवण केले जाते. बाप्पाच्या आवडीच्या मोदकाची मेजवानी असते. आवडीनुसार तळणीचे, उकडीचे मोदक केले जातात. काही जण संकष्टी चतुर्थीच्या जेवणात कांदा- लसून विरहित पदार्थांचा समावेश करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपती बाप्पाची आरती करून त्याला नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी पूजेमध्ये दूर्वा, जास्वंदाचं फूल बाप्पाला अर्पण करण्याची प्रथा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement