Sane Guruji Death Anniversary: साने गुरूजी यांच्या पुण्यतिथी निमित्त जगाला योग्य दिशा दाखवणारे या विद्वान पुरुषाचे 10 अमूल्य विचार
साने गुरुजींची शिकवण, त्यांचे विचार, त्यांची मूल्य विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून गेली किंबहुना येणा-या प्रत्येक पिढीपर्यंत हे विचार नक्कीच प्रगतीपथावर घेऊन जातील असे आहेत.
Sane Guruji 71st Death Anniversary: ज्ञानाचा अथांग सागर असलेल्या साने गुरुजी (Sane Guruji) यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला. त्यांचे संपूर्ण पांडुरंग सदाशिव साने असे होते. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले.
साने गुरुजींची शिकवण, त्यांचे विचार, त्यांची मूल्य विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून गेली किंबहुना येणा-या प्रत्येक पिढीपर्यंत हे विचार नक्कीच प्रगतीपथावर घेऊन जातील असे आहेत.
म्हणूनच साने गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊन त्यांचे अमूल्य विचार
- आपले मन म्हणजे एक महान जादुगार व चित्रकार आहे, मन म्हणजे ब्रह्म सृष्टीचे तत्त्व आहे.
- आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राज राजेश्वरीच्या ऐश्वर्या लाही लाजवील, हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत.हेदेखील वाचा- Sane Guruji Death Anniversary: साने गुरुजींच्या आठवणींना उजाळा देतील त्यांनीच लिहिलेल्या या निवडक कविता
- करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे.
- कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन.
- कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा ही आजची भाकर आहे.
- जिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकता येईल ते आदराने घ्या.
- ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे, ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञानही नव्हे, ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान.
- आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत, वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही, मुख्य महत्त्व माणुसकीला आहे.
- जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, असत्य असते ते अदृश्य होते.
- सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने वितळतात.
11 जून म्हणजे साने गुरुजी यांची पुण्यतिथी. 11 जून 1950 रोजी साने गुरुजी यांचे निधन झाले. महात्मा गांधी यांच्या हत्येबरोबरच स्वातंत्र्यानंतरच्या अनेक मुद्द्यांमुळे ते अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असे सांगितले जाते. साने गुरुजींच्या गुरु प्रत्येकाच्या आयुष्यात असावा ज्याने करुन त्या विद्यार्थ्याच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त साने गुरुजींच्या स्मृतीस शत शत प्रणाम!