भारतीय प्रजासत्ताक दिन 2020: 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत गुगलने बनवले खास डूडल

'India Republic Day 2020' असं शिर्षक देऊन गुगलने खास डुडल तयार केलं आहे. या डूडलमध्ये भारतीय संस्कृतीचे झलक दाखवण्यात आली आहे. यात दिल्लीतील इंडिया गेट, ताजमहल, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, भारतीय कला, संस्कृती, टेक्सटाइल, नृत्य आदी सांस्कृतिक ठिकाणे आणि वस्तू दाखवण्यात आल्या आहेत.

India Republic Day 2020 Google Doodle (PC - Google)

देशभरात आज 'प्रजासत्ताक दिन' (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा होत असून गुगलनेही डुडलद्वारे देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'India Republic Day 2020' असं शिर्षक देऊन गुगलने खास डुडल (Google Doodle) तयार केलं आहे. या डूडलमध्ये भारतीय संस्कृतीचे झलक दाखवण्यात आली आहे. यात दिल्लीतील इंडिया गेट, ताजमहल, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, भारतीय कला, संस्कृती, टेक्सटाइल, नृत्य आदी सांस्कृतिक ठिकाणे आणि वस्तू दाखवण्यात आल्या आहेत.

गुगलने या डुडलची अत्यंत सुबक आणि कलरफुल डिझाइन केली आहे. यात भारताचा ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 मध्ये संविधान लागू करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने दरवर्षी 26 जानेवारी रोजी देशात 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राजधानी दिल्लीत राजपथावर त्यानिमित्त तिन्ही दलाचे संचलन होत असते. (वाचा - Republic Day Parade 2020 Live Streaming on Doordarshan and PIB India: आता घरबसल्या पहा दिल्लीच्या राजपथावरील 71 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण)

India Republic Day 2020 Google Doodle (PC - Google)

आज 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीचा राजपथ पूर्णपणे सजला आहे. राजपथावर काही वेळात सैन्यदलाची शक्ती, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीचा भव्य प्रदर्शन होणार आहे. आज ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायेर बोलसोनारो हे या विशेष कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी पथसंचलनात राजपथावर सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती दर्शविणारे 22 चित्ररथ दाखवण्यात येणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif