Sadbhavana Diwas 2019: राजीव गांधी यांचा जन्मदिन 'सदभावना दिवस' म्हणून का साजरा केला जातो?
पण राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून साजरी करण्याचं नेमकं कारण काय? भारतामध्ये सदभावना दिवस कसा साजरा केला जातो हे नक्की जाणून घ्या.
Sadbhavana Diwas 2019 Date & Significance: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (20 ऑगस्ट) 75 वी जयंती आहे. या दिवसाचं औचित्य साधून देशभरात कॉंग़्रेस पक्षाकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राजीव गांधी यांचा जन्मदिन (Rajiv Gandhi Birth Anniversary) भारतामध्ये कॉंग्रेस पक्षाकडून 'सदभावना दिवस' (Sadbhavana Diwas) म्हणून साजरा केला जातो. पण राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून साजरी करण्याचं नेमकं कारण काय? भारतामध्ये सदभावना दिवस कसा साजरा केला जातो हे नक्की जाणून घ्या. Rajiv Gandhi on his 75th Birth Anniversary: भारताच्या पहिले युवा पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी 5 आश्चर्यकारक गोष्टी
भारताचे माजी पंतप्रधान हे भारताचे सर्वात तरूण पंतप्रधान आहेत. राजीव गांधी यांची आई आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी हे भारतीय राजकारणामध्ये आले. पेशाने वैमानिक असलेले राजीव गांधी पंतप्रधानपदी रूजू झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या धोरणांमधून विकसित भारताचं स्वप्न देशाला दाखवलं.
सदभावना दिवस तारीख आणि महत्त्व
राजीव गांधी यांचा जन्मदिन म्हणजेच 20 ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये सदभावना दिवस म्हणून साजरा केला जातो. सदभावना दिवसाचं औचित्य साधून भारतीयांना खास शपथ दिली जाते. देशामध्ये राष्ट्रीय एकता, शांती, प्रेम टिकून रहावं आणि वृद्धिंगत व्हावं यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारा देशातील सार्या जाती-धर्मांमध्ये सलोख्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
सदभावना या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडला आहे. या दिवसाचं औचित्य साधून इतरांप्रती चांगली भावना, हित यांची कामना करा असा हा दिवस आहे.
राजीव गांधी यांचा मृत्यू देखील भयंकर मानवी बॉम्बस्फोटाद्वारा झाला. 1991 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान लिट्टे या दहशतवादी संघटनेने मानवी बॉम्बचा वापर करून राजीव गांधींची हत्या घडवून आणली. अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.