Rashtrasant Tukdoji Maharaj Death Anniversary 2022 Messages: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार
त्यांच्या कार्यामुळे त्यांना अवघा देश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो. त्यांचे प्रेरणादायी विचार आजही समाजाला उपयोगी पडतात. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार . जे आम्ही येथे देत आहोत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Rashtrasant Tukdoji Maharaj Death Anniversary) यांची आज (14 ऑक्टोबर) पुण्यतिथी. त्यांच्या कार्यामुळे त्यांना अवघा देश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (Rashtrasant Tukdoji Maharaj) म्हणून ओळखतो. त्यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे असे आहे. त्यांचा जन्म 1909 तर मृत्यू 1968 मध्ये झाला. त्यांनी ग्रामगीता या ग्रंथातून आत्मसंयमनाचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले. त्यांनी मराठी आणि हिदीं अशा दोन्ही भाषांतून काव्यरचना केली. त्यांच्या प्रबोधनाचे एक खास वैशिष्ट्य होते. ते म्हणजे खंजिरी भजन. खंजिरी भजनातून ते समाजप्रबोधन करत. त्यांनी मोझरी येथे 1935 मध्ये गुरुकुंज आश्रम स्थापन केला. त्यांचे प्रेरणादायी विचार आजही समाजाला उपयोगी पडतात. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार (Thoughts of Rashtrasant Tukdoji Maharaj). जे आम्ही येथे देत आहोत.
राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांचे काही प्रेरणादायी विचार खालील प्रमाणे
मरणास भिऊन रडत बसण्यापेक्षा
मरणे अमर कसे होईल याची चिंता करा
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
धैर्यहीन मनुष्याकरिता त्याची झोपडीही
हिमालयाएवढी मोठी व जड होऊन बसते
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
प्रसंगी मार खाऊनही आपली सत्यनिष्ठा व धैर्य न सोडणे
याला मार देणणाऱ्यापेक्षाही धाडस ठेवावे लागते
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
हिसेंपेक्षा अहिंसेची किंमत अधिक मानली जात असते
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
आपल्या शत्रुविषयीही उत्तम बुद्धी ठेवा
त्याने ईश्वराजवळ तुमची कदर होईल
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
मनुष्याचा स्वभाव एखाद्या प्रसंगानेच उघडा पडत असतो
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
शस्त्रे घर्षणाने चमकतात पण शूर संघर्ष प्रसंगानीच चमकत असतो
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
तुकडोजी महाराजांची ग्रामीण भारतावर विशेष श्रद्धा होती. ते सांगत की, भारत हा खेड्यांचा देश आहे. त्यामुळे देशाच्या विकासाचा विचार करताना ग्रामीण भारत विसरता कामा नये. जर ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकेल. अन्यथा होणार नाही. ग्रामीण विकास वगळून राष्ट्र घडणार नाही, अशी त्यांची पक्की धारणा होती. समाजातील सर्व स्तरातील घटकांचा विकास होईल यासाठी ते विशेष आग्रही होते. त्यामुळे त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्यातही स्वत:ला झोकून दिले.