Ram Navami 2020 Messages: राम नवमी निमित्त मराठी संदेश, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून वंदन करुया श्रीरामाला!
पण नाराज होऊ नका. राम नवमी निमित्त विविध संदेश, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images तुम्ही सोशल मीडियाद्वारे शेअर करुन रामनवमीचा उत्साह कायम ठेवू शकता.
Ram Navami 2020 Messages: चैत्र महिन्यातील शुक्ल नवमीला भगवान श्रीरामाचा जन्म झाला. राजा दशरथ आणि कौशल्या यांच्या पोटी साक्षात् विष्णूने जन्म घेतला. दशवतारातील राम हा सातवा अवतार. पृथ्वीवरील पाप, वाईट, दृष्ट प्रवृत्ती यांचा नायनाट करण्यासाठी भगवान विष्णू श्रीरामाच्या रुपात पृथ्वीवर अवतरले. सत्यवचनी, एकवचनी, मातृ-पितृ भक्त आणि प्रजाप्रेम या गुणांच्या आधारावर श्रीराम 'आदर्श राजा' झाले. सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत आहे. त्यामुळे सारं काही मनाप्रमाणे चालले असताना आपण 'रामराज्य' आहे असं म्हणतो. किंवा महाराष्ट्रात काही ठिकाणी एकमेकांना भेटल्यावर 'राम राम' म्हणण्याची पद्धत आहे. रामाच्या याच महिम्यांमुळेच सर्वजण रामनवमीचा उत्सव अगदी थाटामाटात आणि उत्साहात साजरा करतात. (राम नवमी यंदा 2 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व)
चौदा वर्षे वनवास भोगणाऱ्या या राजाच्या जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल महिन्यातील नवमीला दुपारी ठीक बारा वाजता झाला. त्यामुळे अनेक राममंदिरांमध्ये दुपारी बारा वाजता पाळणा गायला जातो. महाराष्ट्रातील अनेक राममंदिरात मोठ्या प्रमाणावर रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे लॉकडाऊन असल्याने सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तसंच यंदा मंदिरात जावून भक्तांना रामाचे दर्शन घेता येणार नाही. पण नाराज होऊ नका. राम नवमी निमित्त विविध संदेश, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images तुम्ही सोशल मीडियाद्वारे शेअर करुन रामनवमीचा उत्साह कायम ठेवू शकता.
राम नवमीच्या शुभेच्छा देण्यासाठी संदेश:
अंश विष्णुचा राम,
धरेची दुहिता ती सीता
गंधर्वांचे सूर लागले
जयगीता गातां
आकाशाशीं जडले
नाते ऐसे धरणीचें
स्वयंवर झाले सीतेचे
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
एक वचनी, एक बाणी
मर्यादा पुरुषोत्तम
श्रीराम
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
दशरथ नंदन राम
दया सागर राम
रघुकूल तिलक राम
सत्यधर्म पारायण राम
राम नवमीच्या शुभेच्छा!
चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिही वात उष्ण हे किती!
दोन प्रहरीं कां ग शिरीं सूर्य थांबला
राम जन्मला ग सखी राम जन्मला
राम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा!
WhatsApp Stickers च्या माध्यमातून कशा द्याल रामनवमीच्या शुभेच्छा:
सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. राम नवमीच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Ram whatsapp stickers टाईप करा आणि डाऊनलोड करुन तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा.
राम नवमीच्या दिवशी अनेक रामभक्त रामाची पूजा करतात. भजन कीर्तनाचे कार्यक्रम रंगतात. राम मंदिरांमध्ये रामजन्मोत्सव साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे यापैकी काहीच करता येणार नाही. पण कोरोना व्हायरसचे हे संकट लवकर टळो आणि सर्व निरोगी, आनंदी राहो, अशा शुभेच्छा देऊन यंदाची रामनवमी साजरी करुया.