Raksha Bandhan Wishes In Marathi: रक्षाबंधनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Greetings, Quotes द्वारा देत साजरा करा सण भावा-बहीणींचा!
रक्षाबंधन हा केवळ केवळ राखी बांधण्याचा सण नसून, भावा-बहिणीमधील प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. मग या सणाचा आनंद तुमच्या भावंडांसोबत नक्की शेअर करा.
रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा बहीण-भावाच्या प्रेमाचा, नात्यातील आपुलकी जपण्याचा एक सण आहे. हा केवळ केवळ राखी बांधण्याचा सण नसून, भावा-बहिणीमधील प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. राखीचा धागा हा फक्त एक दोरा नसून तो एक नाते जपण्याचे, एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचे आणि संकटाच्या वेळी साथ देण्याचे वचन असते. श्रावणी पौर्णिमेचा हा रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्टला आहे. मग तुमच्या भावाला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत तुमचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Wishes, Greetings शेअर करून हा दिवस अजून थोडा स्पेशल करा.
रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो, म्हणूनच याला राखी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या समृद्धीसाठी त्यांच्या मनगटावर रंगीबेरंगी राखी बांधतात, तर भाऊ बहिणींच्या रक्षणाचे वचन देतात. नक्की वाचा: Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला यंदा 5 तासांहून अधिक काळाचे चंद्रग्रहण, राखीचा सण साजरा करता येणार का?
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रीटिंग्स
तर आयुष्यभराच्या विश्वासाचं असतं.
भावा-बहिणीचं हे सुंदर नातं,
नेहमी असंच फुलत राहो.
भांडणं आणि प्रेमाची साथ…
अशीच कायम राहो आपल्या नात्याची बात,
रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
मनात सुखाची फुलं असोत.
भावा-बहिणीच्या नात्यात
आयुष्यभर आनंदाचे रंग भरत राहोत.
एक वचन विश्वासाचं…
आयुष्यभर साथ देण्याचं,
हे नातं असंच सुंदर राहो.
कधी एकमेकांना चिडवणं…
पण संकटात नेहमी सोबत राहणं,
हेच तर भावंडांचं खरं नातं!
यंदाच्या रक्षाबंधनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे भद्रा काळाचा अडथळा नसणार आहे. 2026 मध्ये भद्रा काळ सूर्योदयापूर्वीच संपणार असल्याने बहिणींना घड्याळाकडे पाहत घाईघाईत राखी बांधण्याची गरज भासणार नाही, तर मोकळ्या आणि प्रसन्न वातावरणात हा सण साजरा करता येईल.