IPL Auction 2025 Live

Raksha Bandhan 2021 Date: 22 ऑगस्ट रोजी साजरा केले जाईल रक्षाबंधन , जाणून घ्या राखी बांधण्याची शुभ वेळ

बहिणी या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधतात. यावर्षी रक्षाबंधनाचा सण 22 ऑगस्ट 2021 रोजी साजरा केला जाईल.

Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बहिणी या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधतात. अत्यंत प्रेमाचा विश्वासाचा आणि आपूलकीचा असा हा क्षण असतो.  बहिण विवाहीत असेल तर कधी भाऊ बहिणीच्या घरी जातो. कधी बहिण भावाच्या घरी जाते. सासरी नांदायला गेलेल्या अनेक मुली रक्षाबंधनाच्या निमित्ताने माहेरी येतात.यावर्षी रक्षाबंधनाचा सण 22 ऑगस्ट 2021 रोजी साजरा केला जाईल. रक्षाबंधनाचा दिवशी आपल्या भावला राखी बांधण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. (Mangalagaur 2021 Puja VIdhi: मंगळागौर पूजन कसे कराल? जाणून घ्या विधी आणि महत्त्व )

रक्षाबंधन 2021 शुभ मुहूर्त

शुभ वेळ: 22 ऑगस्ट रविवारी सकाळी 05:50 ते संध्या 06.03 वाजेपर्यंत

रक्षाबंधनासाठी दुपारची वेळ : दुपारी 01: 44 ते 04 :23 वाजेपर्यंत

पौर्णिमा तिथीला सुरुवात

21 ऑगस्ट, 2021 संध्याकाळी 07:00 वाजता

पौर्णिमा तिथी समाप्ती

22 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 05:31 वाजता

कशी बांधाल राखी

राखी बांधण्यासाठी ताट घ्या त्यात कुंकू, अक्षता, दिवा, मिठाई आणि राखी ठेवा. राखी बांधण्याआधी भावाला टिळा लावा, त्यावर अक्षता लावा. त्याच्या उजव्या हातावर राखी बांधा. त्यानंतर भावाची आरती ओवाळा. त्याला मिठाई देऊन तोंड गोड करा. राखी बांधल्यानंतर भाऊ बहीण यांनी इच्छेनुसार एकमेकांना भेटवस्तू द्याव्यात.

भद्रा, शनिदेवाची बहीण जिला अत्यंत अशुभ म्हटले जाते, ती रक्षाबंधनाच्या दिवशी दिवसभर राहणार नाही. रक्षाबंधनाचा सण नेहमी भद्रा आणि ग्रहणातून मुक्त झाल्यावरच साजरा केला जातो. शास्त्रांमध्ये फक्त भद्रामुक्त काळातच राखी बांधण्याची परंपरा आहे. भद्रामुक्त काळात राखी बांधल्याने सौभाग्य वाढते. यंदा दिवसभर भद्रा मुक्तकाळ असेल.