Raksha Bandhan 2020: रक्षाबंधन निमित्त लॉकडाऊनमध्ये यंदा बहिणीसाठी ‘गिफ्ट’ घेण्याचा विचार करताय? या Gifts आयडिया ठरतील खास
या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून या नात्याला घट्ट करण्याचा प्रयत्न करत असते. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील पवित्रतेचा महिमा गायला आहे. भाऊ-बहिणींच्या नात्यात प्रेम, काळजी असते. वयात अंतर असलं तरी दोघांमध्ये मैत्रिची भावना असते. यंदा 3 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे.
Raksha Bandhan 2020: रक्षाबंधन म्हणजे बहिण आणि भावाच्या नात्यातील प्रेमाचा सण. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून या नात्याला घट्ट करण्याचा प्रयत्न करत असते. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील पवित्रतेचा महिमा गायला आहे. भाऊ-बहिणींच्या नात्यात प्रेम, काळजी असते. वयात अंतर असलं तरी दोघांमध्ये मैत्रिची भावना असते. यंदा 3 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे.
राखी बांधल्यानंतर प्रत्येक भावाला आपल्या बहिणीला भेटवस्तू द्यावी लागते. यंदा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपल्या बहिणीच्या आरोग्यदायी जीवनासाठी तसेच तिला लॉकडाऊन काळात उपयोगी येणाऱ्या काही खास भेटवस्तूविषयी जाणून घेऊयात. या भेटवस्तू तुमच्या बहिणीला नक्की आवडतील. (हेही वाचा -Friendship Day 2020: फ्रेंडशीप डे निमित्त घराच्या घरी Friendship Bands कसे बनवाल?)
हँड सॅनिटायझर -
कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सुचना सरकार वारंवार देत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला हँड सॅनिटायझर गिफ्ट करू शकता. हे गिफ्ट तिच्या नक्की उपयोगात येईल आणि विशेष म्हणजे हे गिफ्ट दिल्यानंतर तुमची बहिणी नक्की खूश होईल.
टेबल -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांना घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तुमच्या बहिणीलादेखील घरातून काम कराव लागत असेल, तर तुम्ही यंदा तिला रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून टेबल देऊ शकता. जेणे करून तिला अगदी कन्फर्ट वाटेल.
लॅपटॉप -
तुमची बहिण घरातून काम करत असेल, तर तुम्ही तिच्यासाठी लॅपटॉप खरदी करू शकता. वर्क फ्रॉर्म हॉम साठी हे गिफ्ट तिच्यासाठी खास ठरू शकतं. विशेष म्हणजे तुम्हाला यासाठी मार्कटमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे गिफ्ट खरेदी करू शकता.
योगा मॅट -
सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना जिममध्ये जाणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला व्यायाम करण्यासाठी योगा मॅट गिफ्ट करू शकता. हे गिफ्ट देऊन तुम्ही अगदी कमी पैशात आपल्या बहिणीला खूश करू शकता.
पॉवरबँक -
सध्या लॉकडाऊनमुळे सर्वचं जण मोबाईलवर जास्तीत-जास्त वेळ घालवत आहेत. त्यामुळे दिवसभर मोबाईलची चार्जिंग संपण्याची शक्यता असते. बाहेर गेल्यानंतर अचानक चार्जिंग संपल्यानंतर संपर्कासाठी अनेक अडचणी येऊ शकता. तसेच कोरोनाच्या संकटात इतरांच्या वस्तू वापरण धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे यंदा रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून तुम्ही तुमच्या बहिणीला पॉवरबँक गिफ्ट करू शकता.
मास्क -
केंद्र तसेच राज्य सरकारकडून कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरण बंधनकारक करण्यात आलं आहे. मास्क वापरल्याने कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो. त्यामुळे यंदा तुमच्या बहिणीला रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून मास्क देणं खास ठरू शकतं. महिनाभर वापरता येतील, इतक्या मास्कचा बॉक्स तुम्ही तुमच्या बहिणीला गिफ्ट करू शकता. वरील सर्व गिफ्ट कोरोना काळात तुमच्या बहिणीला सुरक्षित आणि कोरोनापासून मुक्त ठेवतील.