Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2024 Messages: महान लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Images, Wallpapers, WhatsApp Status शेअर करुन करा त्यांना विनम्र अभिवादन

शाहू महाराजांच्या याच सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षेत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली.

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2024 Messages

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2024 Messages in Marathi:  शैक्षणिक, राजकीय, सामाजिक बदलांसाठी झटणारे, समता, बंधुता यांची शिकवण देणारे, भटक्या, विमुक्त जाती-जमातींचे आधारस्तंभ म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj). कोल्हापूर संस्थानचे छत्रपती असलेल्या राजर्षी शाहू महाराज यांची 6 मे रोजी पुण्यतिथी. 26 जून 1874 रोजी जन्मलेल्या शाहू महाराज यांचे 6 मे 1922 मध्ये निधन झाले. छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवत जयसिंगराव घाटगे. 17 मार्च 1884 रोजी त्यांचे कोल्हापूर राजघराण्यात दत्तक विधान झाले.

राजकोट व धारवाड येथे शाहू महाराजांचे शिक्षण झाले. त्यानंतर 2 एप्रिल 1894 रोजी त्यांना राज्याधिकार प्राप्त झाला. महाराजांनी सुमारे 28 वर्षे राज्यकारभार केला. राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होतेच, यासह आपल्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. बहुजनांना शिक्षण,  स्त्री शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण यासाठी ते जीवनभर झटले.

त्यांनी आंतरजातीय विवाह, विधवापुनर्विवाह, घटस्फोट यासाठी कायदेशीर मान्यता दिली. दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले. शाहू महाराजांनी 1917 मध्ये अस्पृश्यांना जमीन देऊन 'बलुतेदारी-प्रथा' संपविली. त्याचप्रमाणे 1918 मध्ये त्यांनी राज्यातील आणखी एक जुनी प्रथा ‘वतनदारी’ संपविण्याचा कायदा केला.

तर अशा या महान लोकराजाच्या पुण्यतिथीनिमित्त, Images, Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करुन थोर समाजसुधारकाला करा विनम्र अभिवादन. (हेही वाचा: Rajshri Shahu Maharaj Death Anniversary 2024: छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या त्यांचे अमूल्य विचार)

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2024 Messages
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2024 Messages
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2024 Messages
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2024 Messages
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2024 Messages

दरम्यान, शाहूंचा लढा हा समतेसाठी होता, आत्मसन्मानासाठी होता, वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्तीविरुद्ध होता. शाहू महाराजांच्या याच सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षेत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली. अशा या थोर लोकराजा, दलित-पतितांचा उद्धारक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा वयाच्या 48 व्या वर्षी, 6 मे 1922 रोजी मुंबई येथे हृदयविकाराने मृत्यू झाला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif