Bail Pola 2019 HD Images & Wallpapers: बैल पोळा सणाच्या शुभेच्छा देणारी HD Images, Greetings शेअर करून साजरा बळीराजाचा सण!
आजच्या या पोळ्याच्या निमित्ताने शेतकर्यांचा सखा असलेल्या बैलाच्या कष्टांना कृतज्ञता व्यक्त करणार्या या सणाच्या शुभेच्छा देऊन अन्नदात्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी ही खास ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्र शेअर करून पोळ्याचा आनंद नक्की शेअर करा.
Bail Pola 2019 Marathi Greetings: भारत देश हा कृषिप्रधान आहे. 80% भारतीय खेड्यात राहतात, त्यामुळे अर्थाजनासाठी शेतीवर अवलंबून राहणार्या शेतकरी बांधवांसाठी बैल पोळा ( Bail Pola) हा सण महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात विविध प्रांतांत स्थानिक परंपरेनुसार वेगवेगळ्या दिवशी पोळा हा सण साजरा करतात. प्रामुख्याने महाराष्ट्र बेंदूर, बैल पोळा आणि नंदी पोळा अशा तीन स्वरूपात पोळा हा सण साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद महिन्यात पोळा साजरा करण्याची पद्धत आहे. मग आजच्या या पोळ्याच्या निमित्ताने शेतकर्यांचा सखा असलेल्या बैलाच्या कष्टांना कृतज्ञता व्यक्त करणार्या या सणाच्या शुभेच्छा देऊन अन्नदात्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी ही खास ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्र शेअर करून पोळ्याचा आनंद नक्की शेअर करा.(Bail Pola 2019: बैल पोळा सण महाराष्ट्रात श्रावण अमावस्या दिवशी साजरा करण्याचं महत्त्व काय? जाणून घ्या पूजा विधी आणि परंपरा)
पोळ्याच्या शुभेछा देणारी खास शुभेच्छापत्र
पोळ्याच्या दिवशी शेतीच्या कामातून बैलांना आराम दिला जातो. त्यांची खास सजावट करून ओवाळणी केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. ज्या घरात बैलांची जोडी नाही अशा ग्रामीण भागातील घरात पोळ्याच्या दिवशी मातीच्या बैलांच्या मूर्तींच पूजन केलं जातं. गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवून पोळ्याचा सण साजरा केला जातो.