Paush Purnima 2021: पौष पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, व्रत कथा, महत्व आणि पूजा विधी
पौष पौर्णमेला भाविक प्रयागव्यतिरिक्त नाशिक, वाराणसी, उज्जैन, हरिद्वार इत्यादी ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी जातात.
Paush Purnima 2021: पौष पौर्णिमा (Paush Purnima 2021) हा हिंदू दिनदर्शिकेत पौष महिन्यात पौर्णिमेला येणारा महत्वाचा दिवस आहे. या दिवशी हजारो भाविक पवित्र गंगा आणि यमुना नद्यांमध्ये स्नान करतात. पौष पौर्णिमा ग्रेगोरियन दिनदर्शिकेत डिसेंबर-जानेवारी महिन्यात साजरी केली जाते. पौष पौर्णिमेच्या निमित्ताने प्रयाग संगम (गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम) येथे हिंदू भाविक दूरदूरहून येऊन पवित्र स्नान करतात.
पौष पौर्णिमा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि या दिवशी देशाच्या विविध भागातील हिंदू मंदिरांमध्ये विशेष विधी आयोजित केले जातात. काही ठिकाणी पौष पौर्णिमा शाकंबरी जयंती म्हणून देखील साजरी केली जाते. या दिवशी देवी शाकंभरी (देवी दुर्गाचा अवतार) यांची पूजा केली जाते. नऊ दिवस चाललेल्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची समाप्तीही पौष पौर्णिमेने होते. छत्तीसगडमधील लोक या दिवशी 'चरता' उत्सव साजरा करतात. आदिवासींद्वारे मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा महत्त्वाचा उत्सव आहे. (वाचा - Republic Day 2021: Attari border वर यंदा प्रजासत्ताक दिनी Coordinated Parade कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द)
पौष पौर्णिमा तारीख आणि शुभ वेळ -
पौर्णिमेचा प्रारंभ - 28 जानेवारी 2021 गुरुवारी 01 वाजून 18 मिनटांनी
पौर्णिमा समाप्ती - 29 जानेवारी 2021 शुक्रवार रात्री 12:47 वाजता.
पौष पौर्णिमेचे महत्त्व:
वैदिक ज्योतिष आणि हिंदू मान्यतेनुसार पौष महिना भगवान सूर्याचा महिना मानला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर सूर्यास पाणी दिल्यास मोक्ष मिळतो. म्हणूनच या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र स्नान करतात आणि जल अर्पण करतात. पौष पौर्णिमेला सूर्य आणि चंद्राचा गूढ संयोजन दिसून येतो. या दिवशी सूर्य आणि चंद्र या दोन्ही गोष्टींची पूजा केल्याने आशीर्वाद मिळतात आणि इच्छा पूर्ण होतात.
पौष पौर्णिमा व्रत पूजा पद्धत -
- पवित्र स्नान करण्यापूर्वी उपवास करण्याचा संकल्प करा.
- पवित्र नदी, विहीर किंवा कुंडात स्नान करण्यापूर्वी वरुण देवाचे नामस्मरण करा.
- मंत्रांचा जप करताना सूर्यदेवाला पवित्र जल अर्पण करा.
- त्यानंतर भगवान मधुसूदनची पूजा करा आणि नैवेद्य दाखवा.
- एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणांना अन्न दान करा.
- या दिवशी लाडू, गूळ, लोकरीचे कपडे आणि ब्लँकेट्स या गोष्टी दान कराव्यात.
पौराणिक कथेनुसार, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. पौष पौर्णमेला भाविक प्रयागव्यतिरिक्त नाशिक, वाराणसी, उज्जैन, हरिद्वार इत्यादी ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी जातात.