Panvel-Chiplun DEMU Special: गणेशोत्सव 2022 मुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पनवेल-चिपळूण डेमू विशेष सेवा
विशेष डेमू सेवेचा (DEMU Special Services) तपशील खाली दिला आहे.
गणपती उत्सवामुळे (Ganeshotsav 2022) प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी आणि वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वेने पनवेल ते चिपळूण दरम्यान डेमू विशेष सेवा (Panvel-Chiplun DEMU Special Services ) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष डेमू सेवेचा (DEMU Special Services) तपशील खाली दिला आहे. गणपती उत्सव काळात नागरिक मोठ्य प्रमाणावर प्रवास करतात. हा काळ सुट्टीचा असल्याने वाहतूकीवरही ताण येतो हा ताण कमीकरण्याच्या हेतूनेच रेल्वे प्रशासन दरवर्षी विविध उपाययोजना करते. डेमू सेवा हादेखील त्या प्रयत्नांचाच एक भाग मानला जातो.
डेमू सेवा तपशील खालील प्रमाणे
- 01597 DEMU पनवेलहून 07 सप्टेंबर 2022 ते 12 सप्टेंबर 2022 या कालावधीत दररोज 19.15 (सायंकाळी 7.15) वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23.50 (रात्री 11.50) वाजता चिपळूणला पोहोचेल.
- 01598 DEMU चिपळूणहून 07 सप्टेंबर 2022 ते 12 सप्टेंबर 2022 पर्यंत दररोज 13.45 (दुपारी- 1.45) वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 18.30 (सायंकाळी 6.30) वाजता पनवेलला पोहोचेल
थांबे
या विषेस सेवेंतर्गत 8 DEMU कोच गाडी धावेल. ही डेमो गाडी रोहा, माणगाव, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, खेड आदी ठिकाणी थांबे घेईल. (हेही वाचा, Ganpati Uttarpooja Vidhi: दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाला पहा कशी करतात गणपती बाप्पाची उत्तरपूजा!)
DEMU विशेष गाड्या अनारक्षित असतील आणि एक्स्प्रेस भाड्याने धावतील. प्रवासी यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट बुक करू शकतात. प्रवाशांना त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविडचे निमयमांचे पालन करावे लागेल.