Maha Shivratri 2020: महाशिवरात्र निमित्त पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराचा गाभा सजला लाखो बेलपत्रांनी (Watch Video)
त्यामुळे अनेकदा आर्किड किंवा जरबेरा फुलांची मनमोहक सजावट केल्याचं पहायला मिळालं आहे. मात्र आज देशभरात महाशिवरात्रीच्या मंगल पर्वाचं औचित्य साधत विठ्ठल मंदिरामध्येही बेलपत्रांनी सजवण्यात आलं आहे.
महाशिवरात्रीचं औचित्य साधत आज देशभरात भगवान शंकराच्या मंदिराबाहेर भाविकांनी मोठी गर्दी केलेली पहायला मिळाली आहे. त्यासोबतच आज देवांचा देव भगावान शंकर यांच्या भाविकांसाठी खास असलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्येही आकर्षक सजावट पहायला मिळाली आहे. आज भगवान शंकराला प्रिय असलेल्या बेलपत्राच्या मदतीने विठ्ठल मंदिराचा गाभा सजवला आहे. दरम्यान पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये मागील काही दिवसांपासून महत्त्वाच्या सणादिवशी आकर्षक फुलांची सजावट करण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकदा आर्किड किंवा जरबेरा फुलांची मनमोहक सजावट केल्याचं पहायला मिळालं आहे. मात्र आज देशभरात महाशिवरात्रीच्या मंगल पर्वाचं औचित्य साधत विठ्ठल मंदिरामध्येही बेलपत्रांनी सजवण्यात आलं आहे. Maha Shivratri 2020: भारतातील या '6' भव्य शिवमंदिरात 'महाशिवरात्री'चा उत्सव असतो खास.
यंदाची महाशिवरात्र खास असण्याचं अजून एक कारण म्हणजे शश योग. शश योग हा 59 वर्षांनी महाशिवरात्रीच्या दिवशी जुळून आला आहे. दरम्यान आज भगवान शंकराची आराधना करण्यासाठी देशभरातील शंकर मंदिरामध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला आहे. भगवान शंकराला बेल, दूध प्रिय असल्याने आज शंकराच्या पिंडीवर बेलपत्र आणि दूधाचा अभिषेक केला जातो. Maha Shivratri 2020 Puja Vidhi: भगवान शंकराला बेलपत्र, दूध याचा अभिषेक का करतात?
महाशिवरात्री निमित्त सजलेलं विठ्ठल रूक्मिणीचं मंदिर
आज (21 फेब्रुवारी ) महाशिवरात्र सायंकाळी 5.20 वाजता सुरु होईल, जी दुसर्या दिवशी 22 फेब्रुवारी रोजी 22:00 वाजता संपेल. रात्री महाशिवरात्रीची पूजा संध्याकाळी 6.41 ते रात्री 12.52 या वेळेत होईल. यानंतर, दुसर्या दिवशी मंदिरात सर्व विधींसह भगवान शिव यांची पूजा केली जाईल.