Janmashtami Quotes in Marathi: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त WhatsApp Status, Facebook द्वारे शेअर करा बाळ गोपाळाचे प्रेरणादायी उपदेश

तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, Wallpapers द्वारा भगवान कृष्णाचे प्रेरणादायी कोट्स, उपदेश शेअर करू कृष्ण जयंतीचा दिवस साजरा करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

Janmashtami Quotes in Marathi: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त WhatsApp Status, Facebook द्वारे शेअर करा बाळ गोपाळाचे प्रेरणादायी उपदेश
Janmashtami Quotes in Marathi 6 (Photo Credit - File Image)

Janmashtami Quotes in Marathi: भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी (Janmashtami) साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी देशातील सर्व कृष्ण मंदिरे भव्य पद्धतीने सजवण्यात येतात. या दिवशी या मंदिरांमध्ये पूजा करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते. यंदा सोमवारी म्हणजेच 24 ऑगस्टला कृष्णजन्माष्ठमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

या दिवशी कृष्णभक्त मोठ्या उत्साहाने भगवान कृष्णाच्या मूर्तीची पूजा करता तसेच संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान कृष्णाने अनेक उपदेश (Shri Krishna sermons) दिले होते. जे आजही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, Wallpapers द्वारा भगवान कृष्णाचे प्रेरणादायी कोट्स, उपदेश शेअर करू कृष्ण जयंतीचा दिवस साजरा करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Krishna Janmashtami 2024 Wishes in Marathi: कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा, Quotes, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा यंदा गोकुळाष्टमी)

वाईट कर्म करायला लागत नाहीत, ते होऊन जातात,

आणि चांगले कर्म होत नाहीत, ते करायलाच लागतात.

- भगवान श्रीकृष्ण

माणूस चुकीचे कार्य करतेवेळी उजव्या-डाव्या, पुढे-पाठी

चारही बाजूला बघतो पण, वर बघायला मात्र विसरून जातो.

- भगवान श्रीकृष्ण

तुमच्या मनाला जर तुमच्या ताब्यात केलं नाही,

तर ते एखाद्या शत्रूप्रमाणे काम करायला लागेल.

- भगवान श्रीकृष्ण

कर्माचे फळ व्यक्तीला, अशा प्रकारे शोधून काढत,

जसं की वासरू कळपात असलेल्या, गायीमधून आपल्या आईला शोधते.

- भगवान श्रीकृष्ण

मनुष्य आपल्या विचाराने तयार झालेला असतो,

जसा तो विचार करतो, तसा तो बनतो.

- भगवान श्रीकृष्ण

श्रीकृष्ण जन्माचा उत्सव देसभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी वृंदावन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशभरातून अनेक भक्त या दिवशी वृंदावन येथे जन्माष्ठमीचा उत्सव साजरा करण्यासाठी येतात.

(The above story first appeared on LatestLY on Aug 25, 2024 10:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).